Pune

डोण कापरवाडी येथे हुतात्मा नाग्या कातकरी स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

डोण कापरवाडी येथे हुतात्मा नाग्या कातकरी स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

पुणे प्रतिनीधी – दिलीप आंबवणे

डोण ( कापरवाडी ) ता. आंबेगाव जि. पुणे येथे आदिवासी तरूण युवकांच्या वतीने गावपातळीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
तुषार गवारी म्हणाले, हुतात्मा नाग्या महादू कातकरी हे रायगड जिल्ह्यातील उरण जवळ चिरणेरच्या जंगल उठावातील मोठे क्रांतिकारक होत. हा जंगल सत्याग्रह देशभर गाजला. जंगलावर अवलंबून असलेल्या गरीब आणि आदिवासींच्या उपजीविकेच्या साधनांवरच कायद्याच्या माध्यमातून इंग्रजांनी बंदी घातल्याने त्या विरोधात संतापाची लाट उसळली होती.२५सप्टेंबर १९३०रोजी झालेला जंगल सत्याग्रह हा त्याचा भाग होता. त्यात उरण जवळ अक्कादेवीच्या डोंगरावर हजारो शेतकरी सत्याग्रहासाठी जमले होते.हा देश आदिवासींचा हे जंगल आदिवासींचे असा ठणकावून सांगणारा अत्यंत गरीब कुटुंबातील परंतु अत्यंत निडर व धाडसी असा वीर नाग्या कातकरी आंदोलन करताना पोलिसांच्या गोळीबारात धारातीर्थी पडला. यात नाग्या कातकरी क्रांतिकारकासह नऊ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले व वीरमरण आले. हा दुर्लक्षित इतिहास समाजासमोर आणण्याचे काम आदिवासी तरुण पिढीतील युवक करत आहे.
किरण गवारी म्हणाले, आदिवासी संस्कृती निसर्गपूजक आहे. व जगातील महान संस्कृती आहे. तिचा सर्व समाजाने अवलंब करावा.
परशुराम गवारी म्हणाले, आपल्या भाषणात आदिवासी संस्कृती जपली पाहिजे, टिकवली पाहिजे व याची धुरा तरुण वर्गाच्या खांद्यावर आहे त्यामुळे तरुणांनी एकत्र येत आदिवासी अस्तित्व जपण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
सुनील गवारी म्हणाले, आपला इतिहास हा समाजासमोर सर्वांनी आणला पाहिजे व त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन केले. आदिवासी क्रांतिकारक यांच्याविषयी माहिती सांगितली.
यावेळी दिलीप गवारी, बबन गवारी, यशवंत गवारी, प्रतिक विरणक, पुनाबाई सुपे, बाळू गवारी, अजय गवारी, योगेश गवारी, राहुल, गवारी, कृष्णा सुपे, तसेच गावातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीही ग्रामस्त उपस्थित होते.
आशा प्रकारे सर्व नियमांचे पालन करून या डोन गावातील कापरवाडी या वस्तीमध्ये आदिवासी क्रांतिकारक नाग्या महादू कातकरी या क्रांतिकारकाला स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण गवारी यांनी केले. सुनील गवारी यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button