Ratnagiri

आयुक्त पवणीत कौर यांच्यावर कारवाई करा: बिरसा क्रांती दलाची मागणी

आयुक्त पवणीत कौर यांच्यावर कारवाई करा: बिरसा क्रांती दलाची मागणी

रत्नागिरी : श्रीमती. पवणीत कौर, आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे .
निवेदनात म्हटले आहे की,
श्रीमती. पवणीत कौर या मार्च-२०२० पासून TRTI, पुणे आयुक्त पदावर कार्यरत असून २०१४ वर्षाच्या IAS तुकडीतील अधिकारी आहेत वास्तविक TRTI आयुक्त पद हे वरिष्ठ श्रेणीतील आहे मात्र तत्कालीन आदिवासी विकास विभागाच्या वादग्रस्त प्रधान सचिव श्रीमती.मनिषा वर्मा यांच्या विशेष व अर्थपूर्ण मर्जीतील असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
गेल्या एक वर्षांपासून या अधिकाऱ्यांनी TRTI स्वायत्त स्तरावर कोणत्याही प्रकारचे आदिवासी विकासासाठी काम केले नसून केवळ स्वतःचे पती महोदय पुणे स्थित मगरपट्टा भागातील IT क्षेत्रात कामावर आहे त्यामुळे पुण्यात राहायचे अशी स्थिती आहे.
TRTI चे विनित पवार(लेखाधिकारी) व अनंत उगलमुगले (सांख्यिकी सहाय्यक) या दोघांवर भ्रष्टाचार व महिला विनयभंग यासारख्या तक्रारी असून सुध्दा त्यांना पुरेपूर वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच TRTI स्वायत्त चे कोट्यवधी रुपयांचे CASH BOOK आज पर्यंत MAINTAIN केले गेले नाही आहे.हि वस्तुस्थिती आहे. या व अश्या सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारात पवणीत कौर याचाही सहभाग आहे. त्यामुळेच भ्रष्ट सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील आहेत.
TRTI मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विनित पवार आणि अनंत उगलमुगले यांच्या सांगण्यावरून विनाकारण मानसिक त्रास देत असतात विशेष करून आदिवासी समुदायातील अधिकारी व कर्मचारी. सध्याच्या TRTI सह आयुक्त श्रीमती. जागृती कुमरे या प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत असून आदिवासी समुदायातील असल्याने त्यांच्या विरोधात इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव आणून खोट्या तक्रारी गोळा करीत आहेत आणि मंत्रालयात सातत्याने त्यांच्या बदलीचा तगादा लावत आहेत.

TRTI पुणे येथे राज्यभरातील आदिवासी संघटना व लोकप्रतिनिधी हे मोठ्या आशेने आदिवासीच्या विविध समस्यांबाबत भेट देत असतात मात्र त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही उलट आयुक्त श्रीमती. पवणीत कौर यांनी आदिवासी संघटना व लोकप्रतिनिधी यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे अशी खोटी आव आणून सरकारी पैश्यातून दोन खाजगी सुरक्षा रक्षक (Bounser) ठेवले आहेत.

तरी आदिवासीं समाजाचे लाखो रुपयांचे नुकसान करणाऱ्या श्रीमती पवणीत कौर यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी ठाकरे यांच्या कडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button