Ratnagiri

कोरोनाचे राजकारण नको,समाजकारण करा- सुशिलकुमार पावरा

कोरोनाचे राजकारण नको,समाजकारण करा- सुशिलकुमार पावरा

रत्नागिरी : कोरोनावरून राजकारण करू नका तर समाजकारण करा, असे मत सुशिलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी मांडले आहे.आणीबाणीच्या या काळात सध्या कोरोनावरून ठिक ठिकाणी अनेक पक्षांमध्ये राजकारण सुरू झाले आहे. आरोप -प्रत्यारोप अनेक वरिष्ठ नेते एकामेकांवर करताना आपल्याला दिसत आहेत.
कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने राज्यभर लाकडाऊन सुरू केलेले आहे. आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा जनतेच्या संरक्षणासाठी काम करत आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने जारी केलेली नियमावली थोडी कडक वाटत असली तरी ती जनतेच्या आरोग्यासाठी योग्यच आहे. अनावश्यक घराबाहेर फिरणा-यांची तपासणी केली जात असल्यामुळे रूग्ण संख्या वाढत आहे,तरी विनाकारण फिरणा-यांवर कडक कारवाई करणे गरजेचेच आहे.
कोरोना रूग्ण वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणा वर ताण पडला आहे. वाढत्या रूग्णांमुळे हाॅस्पीटल,बेड्स, ऑक्सीजन,इंजेक्शन,व्हेंटीलेटर इत्यादीची कमतरता जाणवत आहे.त्याचे नियोजन करून सोय सरकारी यंत्रणा करत आहेत. रूग्णालये फुल्ल होऊन जागेची कमतरता भासत आहे म्हणून शाळा महाविद्यालये व खाजगी संस्थांमध्ये रूग्णांसाठी सोय केली जात आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. या आणीबाणीच्या काळात अनेक पक्षांचे आमदार खासदार व वरिष्ठ नेते एकमेकांवर कुरघोड्या करू लागले आहेत. तेव्हा या कठीण काळात सत्ताधारी व विरोधक अशा सगळ्या पक्षीय नेत्यांनी एकञ येऊन जनतेच्या हितासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. एकमेकांवर आगपाखड होण्याऐवजी जनतेच्या आरोग्यासाठी एकञ येऊन काम करणे गरजेचे आहे. राजकारण करण्याऐवजी समाजकारण करण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होण्याऐवजी सहानुभूती;आदरभाव निर्माण होईल असे काम करण्याची गरज आहे.
लोकप्रतिनिधीं ,आमदार, खासदार व मंञी यांना लोक विश्वासाने निवडून देतात.शहराप्रमाणेच गावोगावातही कोरोना रूग्ण वाढल्यामुळे रूग्णांची सोय कशी होईल, औषधोपचार उपलब्ध झाला आहे किंवा नाही इत्यादी गोष्टीं कडे राजकारण्यांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहेत.तेव्हा पक्ष नेत्यांनी आपला स्वार्थ, तत्वे बाजूला ठेवून कोवीड रूग्णांना पाठबळ मिळेल व रूग्ण लवकर बरे होतील याकडे लक्ष द्यावे. राजकारण करू नये तर समाजकार्य करावे,असे मत सुशीलकुमार पावरा समाजसेवक यांनी मांडले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button