Ratnagiri

झारली येथील अवैद्य माती उत्खननप्रकरणी आदिवासी बांधवांवर हल्ला करणा-या आरोपीस तात्काळ अटक करा: बिरसा क्रांती दलाची मागणी

झारली येथील अवैद्य माती उत्खननप्रकरणी आदिवासी बांधवांवर हल्ला करणा-या आरोपीस तात्काळ अटक करा: बिरसा क्रांती दलाची मागणी

रत्नागिरी : झारली( वाकी)तालुका डहाणू या अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायद्यातर्गत येणा-या जमिनीवर अवैद्य माती उत्खनन करणा-या व आदिवासी आंदोनकर्ते बांधवांवर हल्ला करायला लावणा-या चंद्रकांत घोरखाना व संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करा,अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आदिवासी विकास मंञी अॅड.के.सी.पाडवी, जिल्हाधिकारी पालघर,उपविभागीय अधिकारी डहाणू व तहसीलदार डहाणू यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे .
निवेदनात म्हटले आहे की, झारली (वाकी )तालुका डहाणू जिल्हा पालघर ह्या अनुसूचित क्षेत्रात पेसा कायदा लागू असलेल्या गावात विना प्रॉपर परवानगीने पाटील आडनावाच्या नावे असलेल्या जमिनीवर अवैध उत्तखन करून मातीचा बाजार (विकणे )करणाऱ्या विरुद्ध, स्पॉट वर काही आदिवासी बांधव शांततेत आंदोलन करत होते.आंदोलन करत असताना त्या गावातील राजकीय व्यक्ती आणि डहाणू चे आमदार ह्यांचे घनिष्ठ संबंध असणारे चंद्रकांत घोरखाना हे आपल्या मुला, जावयाला आणि काही वीस पंचवीस स्थानिकांना काठ्या दांडूक्या सकट घेऊन आला आणि अवैध माती उत्तखन करून विकणाऱ्या विरुद्ध शांततेत आंदोलन करत बसून असलेल्या प्रदीप ढाक (ग्रामपंचायत सदस्य, वाकी, ता. डहाणू ) आणि त्याला साथ देणाऱ्या काही भगिनी वर डायरेक्ट हल्ला चढवला व प्रदीप ढाक यांना बेदम मारहाण केली असल्याची घटना घडली आहे.या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो.
चंद्रकांत घोरखाना यांनी आपल्या साथीदारांसोबत प्रदीप ढाक यांना दांडूक्यांनी त्याचे दोन्ही पाय facture केले, त्याला सोडवायला आलेल्या भगिनींना सुद्धा चंद्रकांत घोरखाना स्वतः मारत होता, त्यांना सुद्धा लाथा बुक्यांनी तुडवले आहे.नंतर स्वतःच माती वाहू ट्रॅक च्या काचा वैगेरे फोडून घोलवड पोलीस स्टेशन ला त्वरित जाऊन आंदोलन कर्त्या विरुद्ध “ट्रक वर हल्ला चढवून आंदोलन कर्त्यांनी नुकसान केले, असा जबरदस्तीने खोटा गुन्हा नोंदवला आहे आणि सोशयल मीडिया वर या घटनेबद्धल खोटा संदेश फॉरवर्ड केला की ” माती वाहणाऱ्या कडून /मालकाकडून आंदोलन कर्ते पैसे मागत होते म्हणून त्यांना मारले.”
एका बाजूला जल, जंगल जमीन वाचवण्याचा दावा करायचा, मोर्चे आंदोलने करायची आणि तीच जमीन, माती विकली जावी म्हणून मातीचा अवैध उत्तखन करून धंदा करणा-यांना सपोर्ट करायचा ही कोणती चंद्रकांत घोरखाना ची नीती आहे? हे समजायला मार्ग नाही.
उलट त्याने एक cpm चा सच्चा कार्यकर्ता म्हणून अवैध उत्खनन थांबवायला पाहिजे होते.तर ते थांबावं म्हणून आंदोलन कर्त्यांनाच मारहाण करून खोट्या केसेस नोंदवत आहे.
हे प्रकरण 2 एप्रिल 2021 रोजी घडले आहे. ह्या घटनेच्या चार पाच दिवस अगोदर पासून प्रदीप ढाक अवैध उत्खनन थांबावे म्हणून रीतसर आंदोलन करत होता, स्पॉट वर जाऊन लाईव्ह विडिओ काढून फॉरवर्ड करत होता, लाईव्ह विडिओ काढून पाठवत होता.अवैध उत्तखन थांबावे म्हणून आवश्यक ते पञव्यवहार केलेला आहे.प्रदीप ढाक यांचा उद्देश यातून अवैद्य उत्खनन थांबवणे हाच होता. चंद्रकांत घोरखानाने मारहाण तर केलीच पण प्रदीप ढाक चा मोबाईल खिशातून काढून, लंपास केला अंगावरचे दागिने काढून घेतले, त्याच बरोबर काही आंदोलन कर्त्यांचे सुद्धा मोबाईल लांबवले.असे FIR मध्ये नोंद आहे
आणि FIR मध्ये IPC कलम 394,326 लागून सुद्धा हा माणूस बिनधास्त मोकळा फिरत आहे, पोलीस कोणतीच कारवाई करत नाहीत.पोलीस आरोपीला पाठीशी घालत आहेत. असे एकंदरीत दिसत आहे. म्हणून आरोपी चंद्रकांत घोरखाना व घटनेसंबंधीत आरोपींवर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी व आरोपींना कठोर शिक्षा करावी. जेणेकरून आदिवासी बांधवांवर होणारे असे हल्ले व अत्याचार थांबतील. हीच नम्र विनंती. अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा सुद्धा सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी शासनाला दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button