Ratnagiri

खावटी योजनेवरून आदिवासींना उल्लू बनवू नका- सुशिलकुमार पावरा

खावटी योजनेवरून आदिवासींना उल्लू बनवू नका- सुशिलकुमार पावरा

रत्नागिरी : पहिल्या लाकडाऊन कालावधीत जाहीर झालेली खावटी योजनेचे आमच्या ११ लाख ५५ हजार गरीब आदिवासी बांधवांना अजूनही लाभ मिळालेला नाही. ही महाराष्ट्रातील फार मोठी दुर्दैवाची बाब आहे. अनेक आदिवासी संघटनांनी निवेदन द्वारे आदिवासींना खावटी लवकरात लवकर द्या.अशी वारंवार मागणी आदिवासी विकास मंञी व संबंधित खात्यातील अधिकारी यांच्या कडे केली. मात्र आदिवासी खात्याने या मागणी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. आदिवासींना आज खावटी देतो उद्या देतो परवा देतो म्हणून मंञी व अधिकारी फसवून राहिले आहेत. आदिवासी बांधवांना उल्लू बनवून राहिले आहे. तेव्हा पहिले हे फसविण्याचे काम बंद करा. निवेदन व बातम्या बघून आता तरी लाज वाटू द्या.शरम वाटू द्या. नुसत्या घोषणा करू नका.त्याची अम्मलबजावणी करा. आदिवासी लाभार्थी यांना पूर्वीचे 4 हजार व आताचे 2 हजार रुपये तात्काळ बॅन्क खात्यात जमा करा. या 6 हजार रुपये पैकी एक रूपया जरी कमी दिला तरी तुम्हाला आदिवासी समाज माफ करणार नाही. आदिवासी मंञी असो किंवा अधिकारी असो.आदिवासी मंञी ला याची किंमत निवडणूकीत मोजावी लागेल. माञ जे हलगर्जीपणाने काम करत आहेत अशा अधिका-यांना सुद्धा नोकरीतून तात्काळ काढा अशी आमची मागणी आहे. ज्यामुळे आदिवासी समाजाला एवढे वर्षभर ताटकळत ठेवले, प्रतिक्षा करावी लागली.तेव्हा आदिवासी समाजाला एवढा भोळा समजू नका.हा आदिवासी समाज रस्त्यावर उतरला तर तुम्हाला जागा मिळणार नाही,असा आंदोलनाचा इशारा सुद्धा सुशीलकुमार पावरा यांनी दिला.आदिवासीं लाभार्थी यांना तात्काळ खावटीचे 6 हजार रूपये द्या.नाहीतर आदिवासी समाजाशी तुमची गाठ आहे.तुम्हाला आदिवासी समाज माफ करणार नाही. अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button