Erandol

एरंडोल येथे पोलिस पथकाचे पथसंचलन

एरंडोल येथे पोलिस पथकाचे पथसंचलन

विक्की खोकरे

एरंडोल:येथे दि.१०मार्च २०२०, मंगळवार रोजी पोलिस स्टेशन तर्फे शहरातील विविध भागातून पथसंचलन करण्यात आले.
सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी पथसंचलनाचे नेतृत्व केले. या पथसंचलनात दंगा काबू नियंत्रण पथक, अमळनेर येथील पोलीस व एरंडोल येथील पोलीस सहभागी झाले.
मरीमाता चौक परीसरात दंगल काबू योजनेची रंगीत तालिम घेण्यात आली. या उपक्रमामुळे नागरीकांमध्ये सुरक्षेची भावना वाढणे, समाजकंटक व गुन्हेगारी प्रवृत्ती च्या लोकांना कायद्याचा आणी पोलिसांचा धाक वाटणे,समाजामध्ये शांतता राहून जातीय सलोखा व बंधुभाव वृध्दिंगत होणे या बाबींना चालना मिळणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button