Erandol

? दिड लाखांची लाच भोवली..अमळनेर चा रहिवासी “ढमाळ” अखेर ढासळला..!अमळनेर मध्येही खूप होते किस्से..!धुळे एसीबीच्या कारवाईने लाचखोरांसाज धाबे दणाणले..!

? दिड लाखांची लाच भोवली..अमळनेर चा रहिवासी “ढमाळ” ढासळला..!धुळे एसीबीच्या कारवाईने लाचखोरांचे धाबे दणाणले..!

एरंडोल : सील केलेले गाळे ताब्यात देवून त्याचे नूतनीकरण करण्याच्या मोबदल्यात दिड लाखांची लाच मागणार्‍या एरंडोल पालिकेतील लाचखोर कार्यालय अधीक्षक संजय दगडू धमाळ (51, रा. 24, म्हाडा कॉलनी, अमळनेर, जि.जळगाव) यास शुक्रवारी दुपारी धुळे एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच एरंडोल पालिकेच्या वर्तुळातील लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान मोठ्या रकमेची लाच कुणाच्या सांगितल्यावरून मागितली असावी याचा उलगडा खोलवर चौकशीत होणार आहे. या प्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

एरंडोल शहरातील 51 वर्षीय तक्रारदाराने धुळे एसीबीकडे या संदर्भात 12 रोजी तक्रार नोंदवली होती. आरोपी पालिका कार्यालय अधीक्षक संजय दगडू धमाळ यांनी तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या नगरपालिका दुकान संकुलातील करार संपल्याने सील केलेले गाळे लिलावामध्ये ताब्यात देऊन तसेच तक्रारदार यांच्या इतर गाळ्याना नोटीस न देण्यासाठी 12 मार्च रोजी दोन लाखांची लाच मागितली मात्र दिड लाखात तडजोड झाली. एसीबीने सापळा रचल्यानंतर आरोपीने शुक्रवारी दुपारी दिड लाखांची लाच पालिकेत स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली तर पालिकेत यानंतर मोठी खळबळ उडाली.

हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण व प्रकाश झोडगे, सुधीर सोनवणे, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, राजन कदम, सुधीर मोरे यांच्या पथकाने यशस्वी केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button