Erandol

?अभिमानास्पद…कोरोना योद्धा विक्की खोकरे यांना “आरोग्यदाता पुरस्कार” जाहीर…!

?अभिमानास्पद…कोरोना योद्धा विक्की खोकरे यांना “आरोग्यदाता पुरस्कार” जाहीर…!

एरंडोल-येथील सर्वसामान्यांचा देवदूत समजला जाणारा कोरोना योद्धा विक्की खोकरे यांना नागपूर येथील श्री संभाजी राजे प्रतिष्ठित सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय “आरोग्यदाता” पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला
भीषण कोरोना काळात गेल्या वर्षापासून आपल्या अॅम्बुलन्सच्या माध्यमातून कोरोना रूग्णांसाठी देवदूतासारखी दिवसरात्र सेवा करणाऱ्या विक्की खोकरे यांनी एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल होणाऱ्या सर्वसामान्य, गोरगरीब कोरोनाग्रस्तांसाठी संपूर्ण कोरोना काळात मदत कार्य सुरूच ठेवले आहे व रोज रुग्णांना फलाहार देण्यासाठी त्यासाठी त्याने रुपये पंचवीस हजार फळे विक्रेत्याला देऊन अत्यावश्यक रुग्णांना पोषण आहार देत आहे.

त्यांचा या आरोग्य सेवेमुळे एरंडोल शहर नव्हे तर पूर्ण ग्रामीण भागात देखील नागरिकांना फार मोठा दिलासा मिळत आहे.
विक्की खोकरे हा तरुण या कोरोना महामारीच्या काळात गोरगरीब रूग्णांना रूग्णालयात दाखल करणं, त्यांना बेड मिळवून देण्यापासून ते बरा होईपर्यंत सेवा देण्याचं काम अव्याहत करतो आहे.त्यासाठी एका रुग्णाला धुळ्याला पोहोचवत असताना आॅक्सीजन सिलेंडरचा काॅक तोंडावर आदळून तो गंभीर जखमी झाल्यावही त्याने आधी रूग्णाला रूग्णालयात पोहोचवून आधी रूग्णाचे प्राण वाचवले नंतरच स्वतःवर उपचार केले. सर्व सामान्य गोरगरीब जनतेच्या दृष्टीने तो केवळ कोरोना योद्धाच नव्हे तर रूग्णांसाठी देवदूतच समजला जातो. एरंडोल रूग्णालयात रोज पंचवीस ते तीस आॅक्सीजन लेव्हल कमी असलेले गंभीर रूग्ण दाखल होत आहेत.हे रूग्ण ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब परिवारातून असल्याने त्यांना पोषक आहार मिळणं शक्य नाही, हे ओळखून विकीने फळ विक्रेत्याला रूपये पंचवीस हजार देऊन या रूग्णांना रोज फल आहाराची व्यवस्था केली. जो पर्यंत कोरोना असेल, जो पर्यंत रूग्ण असतील तो पर्यंत फल आहार वाटप सुरु ठेवण्याचा त्याचा संकल्प तो सिद्धीस नेणार आहे. अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संस्था एक दिवस फळ वाटप करून फोटो काढून प्रसिद्धी करतात पण कोरोना काळातील विकीचे हे दातृत्व मोलाचा संदेश देणारं आहे.

एरंडोल तालुक्यात आरोग्य दूत म्हणून ओळखले जाते
विक्की खोकरे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे आमदार चिमणराव पाटील नगराध्यक्ष रमेश भैय्या परदेशी, शालिकभाऊ गायकवाड,रमेश अण्णा महाजन, किशोरभाऊ निंबाळकर, प्रा आर एस पाटील, अॅड मोहन शुक्ला ,अॅड विलास मोरे, दिलीप पवार, बिरजू भाऊ सिरसे शिवसेना नेते आनंदा चौधरी,भगत ,मुन्ना देशपांडे करन केदारे,आदींनी अभिनंदन केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button