Erandol

एरंडोल येथे 1500 कि गांजा जप्त..!एनसीबी ची मोठी  कार्यवाही….

एरंडोल येथे 1500 कि गांजा जप्त..!एनसीबी ची मोठी कार्यवाही….

जिल्ह्यातील एरंडोल येथे एनसीबीच्या पथकाने धडक कारवाई करत १५०० किलो गांजा जप्त केला आहे. यात एका ट्रकमधून गांजाची पोती जप्त करण्यात आली आहेत. दोघा संशयित तस्करांना देखील या कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहेत. दरम्यान, एनसीबीच्या कारवाईबाबत स्थानिक पोलीस देखील अनभिज्ञ असल्याचे कळते. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून राज्यात ड्रग्ज प्रकरण गाजत आहे. एनसीबीकडून देशासह महाराष्ट्रात देखील मुंबईसह ठिकठिकाणी धाडसत्र सुरू आहे. धाडसत्रांमध्ये एनसीबीने अनेक ड्रग पेडलर्सला ताब्यात घतले आहे. तपासात त्यांच्याकडून मिळालेल्या माहीतीच्या आधारे राज्यात ठिकठिकाणी गांजा तस्करांविरोधातही एनसीबीने धडक मोहीम सुरू केली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील कारवाई देखील त्याचाच एक भाग आहे.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे एनसीबीच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने एक ट्रक अडवून त्यात ट्रकमधून वाहतूक करण्यात येणारी १५०० किलो गांजाची पोती जप्त करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या विखाशापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता. यात दोन जणांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही संशयित आरोपी हे आंध्र प्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button