Aurangabad

जुन्या वादातून सराईत गुन्हेगाराकडून युवकाची हत्या

जुन्या वादातून सराईत गुन्हेगाराकडून युवकाची हत्या

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : जुन्या वादातून सराइत गुन्हेगाराकडून संजयनगर येथे एका युवकाची हत्या करण्यात आली आहे. शेख अरबाज उर्फ विशाल याने मंगेश दिनकर माळोदे (रा.२८,  संजयनगर) याचा भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. जिंसी पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री आरोपीला अटक केली आहे. शहरातील संजयनगर येथील सराईत गुन्हेगाराने दोन दिवसांपूर्वी वाद झाल्याचे प्रकरण उकरुन काढत मंगेश माळोदे यांच्यासोबत वाद घातला. मंगेशने आई समोर शिविगाळ केली त्यामुळे त्याच्या डाव्या हाता-पायावर चाकूने वार केला.

यात चाकुचे घाव खोलवर घुसल्यामुळे मंगेश जागीच कोसळला. त्याला आजुबाजुच्या लोकांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, जिन्सी पोलिस याबाबत खबरीमार्फत आरोपी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांनी कुख्यात आरोपीला मध्यरात्री अटक केली. पकडून आणल्यानतर त्यांच्यावर पहाटे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button