Kolhapur

मंजुनाथ भट यांनी मातोश्री वृद्धाश्रमला केली मदत

मंजुनाथ भट यांनी मातोश्री वृद्धाश्रमला केली मदत

कोल्हापूर/ प्रतिनिधी : हिंदुस्तान पेट्रोलियमच्या दक्षिण महाराष्ट्र व गोव्याची रिजनल मॅनेजर श्री मंजुनाथ भट यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत चंबूखडी येथील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट दिली.
या ठिकाणी असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांची त्यांनी विचारपूस करून त्या ठिकाणी फळे वाटप केले व संस्थेला आर्थिक स्वरूपाची मदत केली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी भावनावश होऊन पाच सुवासिनींनी या दाम्पत्याना ओवाळले व साडी चोळीने ओटी ही भरली.
यावेळी मातोश्री वृद्धाश्रमातील वातावरण भाऊकमय झाले होते आत्ताच्या घडीला माता-पित्यांना वृद्धाश्रमांमध्ये ठेवण्याचे प्रमाण पाल्यांकडून होत आहे अशावेळी या दाम्पत्याने येऊन या ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस केली त्यांना मदत केली हे या ज्येष्ठ नागरिकांसाठी घरच्यासारखे वातावरण होते त्यामुळे ही सगळी जेष्ठ नागरिक मंडळी भारावली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button