Amalner

?️ अमळनेर कट्टा… जलसंपदा मंत्री व प्रदेशाध्यक्ष  दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी पक्षाची सर्व सेल फ्रंटलची बैठक, राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमासाठी जोरदार नियोजन सुरू.

?️ अमळनेर कट्टा… जलसंपदा मंत्री व प्रदेशाध्यक्ष दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी पक्षाची सर्व सेल फ्रंटलची बैठक, राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमासाठी जोरदार नियोजन सुरू.

अमळनेर : जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी पक्षाची सर्व सेल फ्रंटलची बैठक शुक्रवारी आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. यावेळी पक्षाच्या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमासाठी जोरदार नियोजन सुरू असून सर्व दौरा यशस्वी व्हावा यासाठी नियोजन सुरू झाले आहे.
बैठकीसाठी जळगाव येथील राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ता योगेश देसले हे उपस्थित होते. प्रारंभी तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी प्रास्ताविक मांडले त्यानंतर योगेश देसले यांनी दौऱ्यानिमित्त सूचना केल्या. त्यानंतर माजी आमदार अमृतराव पाटील यांच्या कन्या कमलबाई पाटील यांनी पाडळसरे धरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळावा यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह करावा अशी सूचना केली.
यावेळी आमदार अनिल पाटील यांनी पक्षाचा राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रम होणार असून कार्यकर्त्यांना संबोधित करतांना प्रत्येक सेल फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यकारणीसह आपला पक्षाच्या कामाचा अहवाल सादर करावा. यावेळी सर्व पदाधिकार्यांनी अपडेट राहावे. आपल्या कार्यकर्त्यांसह धरण स्थळी हजर राहावे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बैठकीत या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन 250 कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी केली होती त्यावेळी उपमुख्यमंत्री यांनी जलसंपदा सचिव व अधिकाऱ्यांना याबाबत निधीची मागणी घेऊन आपल्याकडे प्रस्ताव सादर करावा असे आदेश दिले. त्यामुळे या अर्थसंकल्पात मोठ्या निधीची तजवीज होणार असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी या बैठकीत सांगितले या पार्श्वभूमीवर धरण पाहणी कार्यक्रम व राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमासाठी विविध समित्यांची निवड करण्यात येत असून विविध पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. पाहणी नियोजनासाठी तयारी सुरू असून व्यापक स्वरूपात नियोजन सुरू आहे. विशेष म्हणजे जास्त वेळ अमळनेर मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष देणार असून त्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. बैठकीला कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, शिवाजीराव पाटील, रणजित पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, निवृत्ती बागुल, विनोद जाधव, अशोक पवार, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी महिला जिल्हा सरचिटणीस कविता पवार, तालुकाध्यक्षा योजना पाटील, शहराध्यक्षा आशा चावरीया, विनोद कदम सर, युवक तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे, युवक शहराध्यक्ष निलेश देशमुख, गौरव पाटील, बाळु पाटील, सुनिल शिंपी, भुषण भदाणे, श्रीनाथ पाटील, हर्षल पाटील, आशा शिंदे, भावना देसले, भारती शिंदे, अलका गोसावी, अनिता भालेराव आदी महिला उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button