Amalner

?️अमळनेर कट्टा…मारवाड हद्दीत लोण आणि जैतपिर येथे गावठी दारू अड्डे उध्वस्त…

?️अमळनेर कट्टा…मारवाड हद्दीत लोण आणि जैतपिर येथे गावठी दारू अड्डे उध्वस्त…

अमळनेर :- तालुक्यातील मारवड हद्दीतील लोण खु. येथे दोन व जैतपिर येथे एका गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत गुन्हा दाखल केले आहेत.
जैतपिर येथे मोंढ्या नाल्याकाठी संतोष हिरामण कोळी हा गावठी हात भट्टीची दारू तयार करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्या नुसार सपोनि राहुल फुला यांच्यासह पथकाने तिथे रेड केली.परंतु आरोपीस चाहूल लागल्याने तो पळून गेला. येथे ड्रम व नवसागराची दारू यासह एकूण १९,२५० रुपयाचा मुद्देमाल आढळून आला.सदर दारूचे नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा नाश करण्यात आला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी कायदा नियम ६५ फ, ब, क, ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास पो भास्कर चव्हाण करीत आहेत.

तर लोण खु. येथील गावठाण जागेत झाडाझुडपात खंडू मगण भील हा गावठी दारू पाडताना आढळून आला. त्याठिकाणी 14 हजार 950 रु चा मुद्देमाल सापडला. तसेच लोण बु. गावी झाडाझुडपात आरोपी सरलाबाई सायबु भील ही गावठी दारू तयार करताना आढळून आली. तिथे एकूण 7 हजार 550 रु चा मुद्देमाल आढळून आला. यावेळी दोन्ही ठिकाणी नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश करण्यात आला असून मारवड पोलिसात महाराष्ट्र दारू बंदी कायदा नियम ६५ फ, ब, क, ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास पो. ना. विशाल चव्हाण हे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button