Pune

शिक्षक दांम्पत्याकडून आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत वह्या

शिक्षक दांम्पत्याकडून आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत वह्यापुणे प्रतिनीधी – दिलीप आंबवणेफुलवडे (ता. आंबेगाव ) कोरोना मुळे शाळा बंद असल्याने अनेक शाळांनी ऑनलाइन एज्युकेशन अंतर्गत वर्क फ्रॉम होम उपक्रम सुरू केला आहे .परंतु दुर्गम आदिवासी भागात नेटवर्क नसल्याने ऑनलाईन अभ्यासावरही मर्यादा येतात .लॉकडाऊन मुळे दुकाने उघडी नसल्याने पुस्तके व स्टेशनरी वेळेवर उपलब्ध होत नाही . त्यामूळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी वापरून शिल्लक राहिलेल्या वहयांवरच अभ्यास सुरू केला होता . परंतु अल्पावधीतच या वह्या संपल्याने सरावात खंड पडला होता .लॉकडाऊनमूळे येथील हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांचा रोजगार बंद आहे . त्यांच्या हाताला काम नसल्याने आर्थिक ओढाताण करून त्यांना मूलभूत गरजा भागवाव्यात लागतात . त्यामुळे विद्यार्थ्यांना वह्या ,पुस्तके, स्टेशनरी घेण्याची पालकांची ऐपत राहीली नाही . परिणामी इच्छा असूनही विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नव्हता .
ही अडचण या गावचे शिक्षक मनोहर मोहरे यांनी चाकण येथील शिक्षक दांपत्याच्या निदर्शनास आणून दिली . त्याची दखल घेऊन नितीन मांडेकर व निलिमा मांडेकर या दानशूर दांम्पत्याने मौजे फुलवडे येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकणार्‍या एकूण १४० विद्यार्थ्यांना ७५०० रुपये किमतीच्या उत्तम दर्जाच्या वह्या उपलब्ध करून दिल्या आहेत .लॉकडाऊन उठल्यानंतर सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून विद्यार्थ्यांना या वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे . या कामी ध्यास बहुउद्देशीय कष्टकरी संस्थेच्या अध्यक्षा निता हिले , सदस्य दुलाजी मोहरे, बाळासाहेब मोहरे ,श्रावण हिले, चंद्रकांत मोहरे यांनी पाठपुरावा केला होता .तसेच श्री औदुंबरेश्वर आदिवासी युवा प्रतिष्ठाण (बरकीदरा )फुलवडेचे अध्यक्ष गणेश भारमळ ,कार्यकर्ते राहुल मोहरे, धनाजी भारमळ, संदीप हिले , आकाश मोहरे, अक्षय मोहरे , युवराज मोहरे ,भूषण मोहरे , नामदेव हिले , भिमसेन हिले , ओमकार भारमळ ,प्रविण मोहरे ,यांनी विद्यार्थ्यांना घरपोच वहया वाटपाची जबाबदारी स्वीकारली आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button