Pune

गरिबीवर मात करीत घातली यशाला गवसणी..

गरिबीवर मात करीत घातली यशाला गवसणी..

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील बुवाचे वठार येथील कु.शितल शंकर अनुसे हि घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परिक्षेत चौदाव्या रँक ने पास होऊन यश संपादन केले त्याबद्दल तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
शितल च्या घरची.परिस्थिती अत्यंत गरिब आहे.शितलचे आई वडील रोजंदारीवर कामाला जातात.अतिशय मनमिळाऊ असलेल्या शितलने आपल्या आई वडिलांनी घेतलेल्या कष्टाचे सोने केले.

गरिबीवर मात करीत घातली यशाला गवसणी..

आजही गावातील घर साध्या घरात राहून अभ्यास करून यश मिळवले आहे.तिचे प्रा.शिक्षण मराठी शाळेत बु.वठार येथे व महाविद्यालयात शिक्षण बळवंतराव यादव महविद्यालय पेठ वडगाव येथे झाले.शाळा काँलेजला जाताना शिक्षणाची आवड असणाऱ्या शितल सुध्दा सुट्टी आपल्या आईवडील यांना कामात मदत करत होती शितलकडे अजूनही मोबाईल नाही तिला मिळालेले यशात तिच्या आई वडिलांनी दिलेली साथ ही अत्यंत मोलाची आहे. त्यांच्या मुळेच मला हे यश मिळाले असे शितलने सांगितले.घरी जाऊन शितल व तिच्या आईवडील यांचा सत्कार
श्री.संजय वाघमोडे जिल्हा प्रमुख यशवंत सेना कोल्हापूर
यांनी केला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button