Chalisgaon

चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध, रिकामचोट मुख्यमंत्री बोलणे आले अंगलट…  .

चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध, रिकामचोट मुख्यमंत्री बोलणे आले अंगलट… .

चाळीसगाव प्रतिनिधी- मनोज भोसले

जळगाव, चाळीसगाव – दुधाला जादा दर मिळावा यासाठी महायुतीच्या वतीने दि …. रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आले होते चाळीसगावी देखील आंदोलन झाले या आंदोलनात खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण देखील सहभागी झाले होते मात्र आमदार मंगेश चव्हाण यांचा तोल गेला व उद्धव ठाकरे हे रिकामचोट मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख त्यांनी भाषणात केल्याने याचे पडसाद राज्यभर उमटले असून अनेक शिवसैनिकांनी त्यांना मोबाईल वर कॉल करून याचा जाब विचारत निषेध केला.

दि 3 ऑगस्ट रोजी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस च्या वतीने या घटनेचा निषेध करून चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीपासून महाविकास आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढून तहसीलदार यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले आहे आमदार मंगेश चव्हाण यांनी या वक्तव्याची मागी मागावी अशी मागणी करून त्यांच्या विरोधात घोषणा बाजी करून त्यांच्या प्रतिमेला जोडा मारो आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, तालुका प्रमुख रमेश चव्हाण, जिल्हा उपप्रमुख आर एल पाटील, महेंद्र पाटील, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल निकम, राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष दिनेश पाटील, श्याम देशमुख, यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button