Parola

तामसवाडी येथे बोरी नदी किनारे सत्तावन्न हजाराची गावठी दारू नष्ट…

तामसवाडी येथे बोरी नदी किनारे सत्तावन्न हजाराची गावठी दारू नष्ट…
योगेश पवार पारोळा
पारोळा : पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी नदीच्या काठावर पारोळा पोलिसांनी छापा टाकला असता त्यात 57 हजार रुपयांची गावठी दारू नष्ट करण्यात आली व आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पारोळा तालुक्यात अवैद्य गावठी दारू विक्री सर्रास होत आहे यात राज्य दारूबंदी राज्य उत्पादन शुल्काच्या दुर्लक्षाने हे प्रकार घडत आहे तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू बंदी विरोधात कुठलीही कारवाई केलेली नसल्याचे समजते, आज दिनांक 24 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास पारोळा येथील पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारावर त्यांनी पोलिसांना तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी नदीच्या किनारी शरद संतोष भिल रा तामसवाडी हा इसम गावठी दारूची भट्टीत दारू तयार करत होता यावेळी उपपोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड पो कॉ सुधिर चौधरी, साबे व इतरांनी छापा टाकला असता आरोपीस रंगेहात पकडले व सुमारे 57 हजार रुपयांची गावठी दारू नष्ट केली म्हणून याप्रकरणी आरोपीविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button