Dindori

दिंडोरी येथील मौजे चाचडगावातील गावठाण क्षेत्रातील द्रोण द्वारे सर्वेक्षण पूर्ण गावठाण मिळकत सनद वितरण उपक्रम.

दिंडोरी येथील मौजे चाचडगावातील गावठाण क्षेत्रातील द्रोण द्वारे सर्वेक्षण पूर्ण गावठाण मिळकत सनद वितरण उपक्रम.

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

ग्रामीण विकास भूमी अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र व स्वामित्व योजने अंतर्गत दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव चे द्रोणद्वारे गावठाणाचे नगरभूमापन करण्याचे काम माननीय उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक प्रदेश नाशिक व माननीय जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नाशिक महेशकुमार शिंदे तसेच उपाधीक्षक भूमी लेख दिंडोरी बिपीन काजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले…
12 मार्च 2021 पासून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजनास सुरुवात झाली आहे त्या अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून परीक्षण कामी प्राप्त झालेले मौजे चाचडगाव येथे गावठाणातील सनद वाटप करण्याचा कार्यक्रम आज दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आला
या कार्यक्रम प्रसंगी सरपंच हर्षदा गावंढे,उपसरपंच मनुबाई पेलमहाले,देवीदास पगारे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ व निर्मला बागुल , किशोर गायकवाड , प्रतिभा शिंदे, उप अधीक्षक भूमि अभिलेख दिंडोरी…यांचे सहकार्य लाभले..
सुनिल पाटील पेलमहाले यांनी आभार प्रदर्शन केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button