Dindori

दिंडोरी तालुका कृषी विभागाचे वतीने प्रभात फेरी संपन्न

दिंडोरी तालुका कृषी विभागाचे वतीने प्रभात फेरी संपन्न

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

सन2023हे वर्षे संयुक्त राष्ट संघाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे घोषित केले असून त्याचा प्रचार व प्रसार व्हावा या दृष्टीने दिडोरी तालुक्यातील विविध ठिकाणी अशा प्रभात फेर्यांची आयोजन केले असुन नुकतेच आंबे दिंडोरी येथे या प्रचार व प्रभात फेरीत चे आयोजन झाले यावेळी आंबे दिंडोरी विद्यालयात जय जवान जय किसान शेतकरी रांगोळी रेखाटण्यात आली तृणधान्य पौष्टिक कसे याबाबत विविध मान्यवर महत्त्व पटवून दिले. प्रभात फेरीत पौष्टिक तृणधान्य फलक सामन्य माहिती दर्शवणारी होती प्रसंगी श्री विजय पाटील तालुका कृषि अधिकारी यांनी पौष्टिक तृणधान्य आहार बाबत मार्गदर्शन केले यावेळी श्री साठे साहेब मंडळ कृषि अधिकारी श्री. प्रमोद गोल्हाईत मंडळ कृषि अधिकारी श्री शामकांत पाटील कृषि पर्यवेक्षक मनिषा पाटील कृषिसहाय्यक रुपाली लोखंडे प्रतिभा माघाडे कृषि सहायक मुख्यद्यापक श्री पवार आर एम,उपशिक्षक श्री वाघ एस एस,श्री राजोळे वाय एस श्री परदेशी ए आर श्री भोये डी आर श्रीमती चव्हाण पी जे चौधरी एच एच व घुमरे व पाटील मॅडम शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते ग्रामपंचायतीचे सरपंच श्री कराटे,श्री सुभाष वाघ सदस्य मोतीराम पिंगळे,विलास खर्डे,सागर गायकवाड,अमोल खोडे उपस्थित होते मोठ्या उत्साहाने कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम प्रसंगी आभार श्री प्रमोद गोल्हाईत व मनिषा पाटील यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button