Dindori

दिंडोरीत सामूहिक राष्ट्रगीत व रॅलीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात संपन्न

दिंडोरीत सामूहिक राष्ट्रगीत व रॅलीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात संपन्न

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

दिंडोरी-
दिंडोरी शहरासह तालुक्याच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल च्या प्रांगणात हजारोच्या संख्येने विद्यार्थी, मान्यवर, अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी, शिक्षक यांच्या उपस्थितीत 11.00 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले.राष्ट्रगीतांनंतर शहरातील शाळेच्या विद्यार्थी सहभागाने दिंडोरी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली.वातावरण देशभक्ती व तिरंगीमय झाले होते.
रॅलीचे उदघाटन प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांच्या हस्ते आकाशात तिरंगी फुगे सोडून करण्यात आले.
याप्रसंगी नगरपंचायत मुख्याधिकारी नागेश येवले, पंचायत समिती गटविकास अधिकारी जीभाऊ शेवाळे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नगराध्यक्ष सौ मेघा धिदळे, उपनगराध्यक्ष अविनाश जाधव,कादवा संचालक बाळासाहेब जाधव, कृउबा समिती उपसभापती अनिल दादा देशमुख, गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज ,प्राचार्य रमेश वडजे, सर्व नगरसेवक, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विविध शाळेतील मुख्याध्यापक उपस्थित होते.
दिंडोरी शहरातून काढण्यात आलेल्या या रॅलीत 1500 विद्यार्थी ,200 शिक्षक , महसूल विभाग, शिक्षण विभाग,आजी माजी लोकप्रतिनिधी, दिंडोरी नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. रॅलीत विविध शाळेने चित्ररथ सजवून त्यावर तिरंगी फुगे, ध्वज लावून सजावट केली.चित्ररथावर क्रांतिकारक, समाजसेवक, भारत माता ,ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यसाठी प्राणाची आहुती दिली त्यांच्या विविध वेषभूषा केलेले विद्यार्थी चित्ररथात उभे राहून अभिवादन करत होते.रॅलीतील विद्यार्त्यांच्या हातात तिरंगी ध्वज असल्याने व घोषणा दिल्याने परिसर दुमदुमून गेला होता.या रॅलीत विविध शाळेतील विदयार्थी, लेझीम पथक, बँड पथक, संबळ, या साहित्यासह सहभागी झाल्याने वातावरण संगीतमय झाले होते.
दिंडोरीतील शिवाजी नगर भागातील नागरिकांनी रॅलीवर पुष्पवृष्टी करत स्वागत केले.
रॅलीत अधिकारी, लोकप्रतिनिधी ,शालेय व्यवस्थापन समिती, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विदयार्थी, कर्मचारी अशा हजारोच्या संख्येने सहभागी झाल्याने दोन किलोमीटर रांग लागली होती.यावेळी पोलिसानी ट्राफिक चे उत्कृष्ट नियोजन केले.
या कार्यक्रमात जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी
बालभारती माध्यमिक विद्यालय
जिल्हा परिषद शाळा नं १
गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल
आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल,
गोल्डन डेज इंग्लिश मीडियम स्कूल,डी एड कॉलेज,आदी विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक सहभागी झाले होते.
यावेळी प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर व तहसिलदार पंकज पवार यांच्या हस्ते सहभागी शाळेतील प्राचार्य यांना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी केले.सुत्रसंचलन संतोष कथार यांनी तर आभार प्राचार्य रमेश वडजे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी के पी सोनार,सी बी गवळी,एस डी आहिरे,वंदना चव्हाण,केंद्रप्रमुख शरद कोठावदे, किसन पवार, नामदेव गायकवाड, जनता इंग्लिश स्कुलचे प्राचार्य रमेश वडजे, आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्राचार्य डी बी ढिकले, डी एड कॉलेज च्या प्राचार्य श्रीम एम जे थेटे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रामकृष्ण मोरे ,गोल्डन डेज स्कुल मुख्याध्यापक वंदना मिश्रा, गुरुकुलचे मुख्याध्यापक सोमनाथ सोनवणे, बालभारतीचे सौ शुभदा कुलकर्णी, सागर मटाले, आदींसह सर्व शाळेतील उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, प्राध्यापक, क्रीडा शिक्षक, चित्रकला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
क्षणचित्रे.१)तिरंगी ध्वज लाऊन सजवलेले चित्र रथ
२)रॅलीत सहभागी सर्व मान्यवर केशरी फेट्यात व विद्यार्थी यांच्या हातात तिरंगी ध्वज
३)रॅलीतक्रांतिकारक ,समाजसेवक,यांची वेशभूषा केलेले विध्यार्थी सर्वांचे आकर्षण
४) शहरातून ठिकठिकाणी पुष्पवृष्टी चा वर्षाव
५) हवेत तिरंगी फुगे सोडून रॅलीचे उदघाटन

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button