Dindori

दिंडोरी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखली शिवसेना दोन नंबर वर

दिंडोरी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखली शिवसेना दोन नंबर वर

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

तालुक्यातील काल झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आज तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली त्यामध्ये तालुक्‍यातील 50 ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत आपले वर्चस्व कायम राखले आहे त्याखालोखाल शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहे दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठ्या वणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्तारुढ भगवती पॅनल ने बाजी मारीत सरपंचपदाच्या नऊ जागांवर विजय मिळवला आहे तर विरोधी जगदंबा पॅनलला पाच तर परिवर्तन पॅनल ला तीन जागा मिळाल्या आहेत सरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर भरसट विजयी झाले आहेत आर्थिक दृष्ट्या संपन्न जानोरी ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी पॅनल प्रणित जनसेवा पॅनलने आपले वर्चस्व कायम राखले असून सरपंच पदासह 15 जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले आहे विरोधी परिवर्तन पॅनल ला 2 व आपल्या पॅनल ला एक जागा राखण्यात यश आले आहे सरपंचपदी सुभाष संतोष नेहरे विजयी झाले असून माजी उपसरपंच गणेश तिडके सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहे मोहाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मविप्र संचालक प्रवीण जाधव यांच्या नेतृत्वाखाली क्रांती पॅनलचे सरपंचपदा सह अकरा सदस्य निवडून आले आहे तर सरपंचपदी आशा लक्ष्मण लहांगे विजयी झाल्या आहेत एका जागेवर दोन उमेदवारांना सारखे मतदान झाल्याने एका सदस्याची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली वरखेडा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र उपाडे यांच्या पॅनलची सत्ता आली असून सरपंच पदी केशव वाघले हे विजयी झाले आहे तळेगाव दिंडोरी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला असून दहापैकी आठ जागांवर त्यांच्या गटाने विजय मिळवला असून शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे व गोकुळ चौधरी यांच्या पॅनलचे दोन जागा निवडून आल्या आहेत जवळके दिंडोरी येथे सरपंचपदी सौ भारती तुकाराम जोंधळे विजयी झाल्याने सत्तारूढ गटाने पुन्हा सत्ता राखली आहे विरोधी गटाच्या पाच जागा निवडून आल्या आहेत अनेक ग्रामपंचायती धक्कादायक निकाल लागले असून अनेक ठिकाणी युवकांनी प्रस्थापितांना दणका दिला आहे 50 ग्रामपंचायतीच्या सत्तेवरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी दावे-प्रतिदावे केले आहे दिंडोरी तालुक्यातील सरपंच पदाचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे 1. कसबे वणी – मधुकर भरसट – राष्ट्रवादी
2. जानोरी – सुभाष नेहरे – राष्ट्रवादी
3. मोहाडी – आशा लहानगे – शिवसेना
4. वरखेडा – केशव वागले – राष्ट्रवादी
5. नळवाड पाडा – हिरामण गावित – राष्ट्रवादी
6. आंबेवणी – शोभा मातेरे – राष्ट्रवादी
7. करंजवन – संदीप गांगोडे – राष्ट्रवादी
8. कोचरगाव – कल्पना टोंगारे – राष्ट्रवादी
9. वरवंडी – वंदना धुळे – ईतर
10. तळेगाव – सोनाली चारोस्कर – राष्ट्रवादी
11. देवपूर – कांतीलाल चव्हाण – राष्ट्रवादी
12. मडकीजाम – रोहिणी मोरे – ईतर
13. निगडोळ – कृष्णा रेहरे – ईतर
14. फोफशी – सांगिता जाधव – माकप
15. कृष्णगाव – सुनीता कडाले – राष्ट्रवादी
16. उमराळे खुर्द – सूरज चारोस्कर – राष्ट्रवादी
17. देहरे – मंगला गवळी – ईतर
18. पळसविहीर – फुलाबाई चौधरी – राष्ट्रवादी
19. दहेगाव – मंगल वाघ – राष्ट्रवादी
20. जउळके – भारती जोंधळे – राष्ट्रवादी

21- धाऊर – संगीता बोंबले –
22 – जांबुटके – मंदा लांडे –
23 – खतवड – बबन दोबाडे
24 – कोराटे – अश्विनी दोडके
25 – चारोसे – संगीता गायकवाड
26 – देवघर – मंदाबाई जाधव
27 – झारली – निवृत्ती साबळे
28 – आंबेगण – सुरेश वाघ
29 – अंबानेर – छाया रेहरे
30 – खेडले – उषाबाई वाघ
31 – देवपाडा – नाजूका चौधरी
32 – मोखनळ – रेणुका जोपळे
33 – भातोडे – संगीता महाले
34 – रासेगाव – मंदा बेंडकुळे
35 – अक्राळे – अर्चना डगळे
36 – देवठाण – मनीषा गुंबाडे – राष्ट्रवादी (बिनविरोध)
37 – राजापूर – रामकृष्ण गव्हारे
38 – शिवनई – चंद्रकांत निंबाळकर
39 – टिटवे – सूरज राऊत
40 – तळ्याचा पाडा – हर्षाली गांगोडे – राष्ट्रवादी (बिनविरोध)
41 – पिंपळनारे – छगन कडाळे
42 – मुळाने – ललिता राऊत
43 – माळेगाव काझी – रचना गायकवाड – राष्ट्रवादी (बिनविरोध)
44 – पिंपरखेड – सोनाली मोरे
45 – धागुर – चंद्रकला गामणे
46 – नळवाडी – प्रकाश गायकवाड
47 – धोंडाळपाडा – लता गायकवाड
48 – ढकांबे – मनीषा कोटींदे
49 – कवडासर – ताराबाई राऊत
50 – शिवारपाडा – जनाबाई चौधरी – राष्ट्रवादी (बिनविरोध)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button