Motha Waghoda

चिनावलला कोरोना योध्दा डॉ.परवेज़ खान शकील खान यांचा मुस्लिम बिरादरी तर्फ नागरी सत्कार

चिनावलला कोरोना योध्दा डॉ.परवेज़ खान शकील खान यांचा मुस्लिम बिरादरी तर्फ नागरी सत्कार

मोठा वाघोदा मुबारक तडवी

कोरोना या महाभयंकर आजाराने चिनावल ता रावेर या गावांत थैमान घातलेले असताना डॉक्टर शकिल खान यांनी (कोविड१९) कोरोना प्रादुर्भाव महामारीत निडरपणे रुग्ण सेवा करीत कोरोनाशी लढण्याचे बळ दिले चिनावल गावात अविरत रुग्ण सेवा देत डॉ.परवेज़ यांनी स्वतःची जबाबदारी समजून सर्व ग्रामस्थांची काळजी घेतली उपचार सुरू ठेवले व नागरिकांच्या जिवाची काळजी घेत अटोकाट प्रयत्न केले.
देशात लॉकडाउन सुरू झाल्या पासुन आजतागायत लोकांसाठी स्वतःचे जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत आहेत संकट काळात लोकांना आपली गरज आहे.यांची जाणीव ठेवून घरोघरी प्रत्येक गल्लीबोळात जावुन वैघकिय उपचार केले व जनजागृति केली. त्यांना आयुष डॉक्टर चे आॅनलाइन प्रमाण पत्र सुध्दा प्रदान करण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात सरकारंचे कडून आलेले सर्व अटींचे पालन केले.चांगले उत्तमकार्य केल्यामुळे लोकांच्या मनात त्यांनी कोरोना योध्दा म्हणून स्वतःची छाप उमटवली आहे. अथक परिश्रम व मेहनत घेत आरोग्य सेवा जनजागृती उपाययोजना करत गावाला कोरोना मुक्त करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे व त्यांनी केलेल्या रुग्ण सेवेचा मुस्लिम पंच कमेटी,चिनावल तर्फे सत्कार करण्यात आला.

मुस्लिम बिरादरी चे अध्यक्ष हयात खान, उपाध्यक्ष असलम खान, कलीम मेम्बर,इरफान मेम्बर,शकील जनाब,शेख कलीम
मुस्लिम पंच कमेटी आदींनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच सत्कारार्थी डॉ.परवेज़ खान यांना मुस्लिम पंच कमेटी व सर्व ग्रामस्थांचे आभार मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button