Kolhapur

ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूरच्या वतीने अभ्यास वर्ग संपन्न

ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूरच्या वतीने अभ्यास वर्ग संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी तुकाराम पाटील

ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा यांचे वतीने ‘ एक दिवसीय अभ्यासवर्ग ‘ प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, वाय. पी. पोवार नगर येथे पार पडला.प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक तक्रार निवारण आयोग कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अॅड. सविता भोसले मॅडम व अॅड. राजेंद्र वायगणकर उपस्थित होते.
यावेळी सुरवातीला पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व फोटो पुजन करणेत आले या नंतर पाहुण्यांचे स्वागत सल्लागार सुधाकर भदरगे यांनी केले. जिल्हा अध्यक्ष बी जे पाटील यांनी पाहुण्यांचा सत्कार करून कोल्हापूर जिल्हा ग्राहक पंचायत ने केलेल्या कामाचे माहिती सांगितली.
या वेळी संघटक सुशांत पाटील यांची पूणे विभागीय सदस्य पदी व सचिव दादासो शेलार यांची राज्य आय. टी. विभाग मध्ये निवड झाले बद्दल सत्कार करणेत आला.
अभ्यास वर्गासाठी ग्राहक तक्रार निवारण आयोग, कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा अॅड.सविता भोसले मॅडम यांनी ग्राहक कायदा जुना कायदा व नवीन कायदा या मधील फरक व प्रत्येक कलम वाईज कलम २७ पासून कलम १०० पर्यंत विस्तृत व अभ्यासपूर्ण माहिती व मर्गदशन केले तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा कायदेशीर सल्लागार अँड.राजेंद्र वायगणकर साहेब यानी ग्राहक पंचायत म्हणजे काय या विषयावर मार्गदर्शन केले. ग्राहक पंचायतचे प्रमुख काम म्हणजे ग्राहकांचे प्रबोधन करणे, जागृती करणे, ग्राहकांच्या तक्रारीचा पूर्ण अभ्यास करून ग्राहकांना न्याय मिळवून देणे हे ग्राहक पंचायतच्या कार्यकर्तेचे काम आहे असे संबोधीत केले.
यानंतर शंका निरसनचा कार्यक्रम पार पडला.
सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन संघटक सुरेश माने, व आभार प्रदर्शन अशोक पोतनीस यांनी केले.

यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, जिल्हा संघटीका प्रमोदिनी माने व पूनम देसाई, सदस्य संजय पोवार,वैष्णवी गुरव, इचलकरंजी अध्यक्ष सुरेंद्र दास, करवीर अध्यक्ष यशवंतराव शेळके, शिरोळ अध्यक्ष सदाशिव अंबी,कागल अध्यक्ष तुकाराम पाटील, राधानगरी तालुका अध्यक्ष श्री दिनकर चौगले पन्हाळा अध्यक्ष बाजीराव कदम व ग्राहक पंचायतचे सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button