Yawal

यावल तालुक्यातील निंबा देवी धरण येथील सांडपाण्याचे पाणी नागादेवी पाझर तलावात सोडण्याबाबत निवेदन

यावल तालुक्यातील निंबा देवी धरण येथील सांडपाण्याचे पाणी नागादेवी पाझर तलावात सोडण्याबाबत निवेदन

यावल ( शब्बीर खान )
यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेस मार्फत मुंबईत नामदार जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांची भेट घेत दिले निवेदन यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले निंबा देवी धरण या पावसाळ्यात धरण पूर्णपणे भरले असून नदी विसर्ग सुरू आहे निंबा देवी धरणातले पाणी सांडव्यातून पुढे वाया जात असून ते पाणी नदी जोड प्रकल्प अंतर्गत नागादेवी पाझर तलावात सोडल्यास त्या परिसरातील दहीगाव सावखेडा चुंचाळे बोराळे विरावली कोरपावली मोरडा महेलखेडी नागा देवी नायगाव या परिसरातील सर्वच शेतकऱ्यांना शेतीसाठी व उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याच प्रकारची समस्या जाणवणार नाही व नदीजोड प्रकल्पांतर्गत वाया जात असलेले पाणी नागादेवी पाझर तलावात सोडल्यास सातपुडा पायथ्याशी असलेल्या सर्व परिसर यांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटेल या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. देवकांत बाजीराव पाटील यांनी निवेदनाद्वारे. नामदार जयंत पाटील साहेब यांच्याकडे केली याप्रसंगी राष्ट्रवादी विधानसभेचे विधानसभा प्रमुख अनिल साठे राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटील राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष पवन पाटील आदींनी निवेदन दिले या निवेदनासाठी विधानसभेचे माजी विधानसभा अध्यक्ष माननीय अरुणभाई गुजराथी साहेब देवकांत पाटील यांचे निवेदनाची शिफारस केली होती याच शिफारसची दखल घेत माननीय जलसंपदामंत्री जयंत पाटील साहेब यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची संपर्क साधून चौकशी निर्णय घेऊ असे सांगितले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button