sawada

सावदा, कोचुर परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी, उळिद, मुंग, मका, ज्वारी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान! शेतकरी हवालदिल :

सावदा, कोचुर परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी, उळिद, मुंग, मका, ज्वारी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान!
शेतकरी हवालदिल :
आमदार चंद्रकांत पाटील, आमदार शिरीष चौधरी यांनी केली पाहणी : तहसीलदारांना दिले पंचनाम्याचे आदेश.

सावदा युसुफ शाह

काल दि.18 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी झालेल्या वादळीवाऱ्या सह पावसामुळे सावखेडा,खिरोदा,रोझोदा, कोचुर शिवारात उभ्या केळी पिकाचे –
कांदेबाग,पिलबाग,जुनारी ज्वारी,मका,पिकाचे शेतकरीवर्गाचे अतोनात नुकसान झालेल्या पिकांची शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, आमदार शिरीष चौधरी, प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, युवा सरपंच स्वाती परदेशी. मनोज येवले, युवासेना जिल्हा सरचिटणीस सुरज परदेशी, रवि महाजन,अनिल महाजन, मंगेश पाटील, राहुल महाजन, अतुल पाटील, योगेश पाटील, कैलास पाटील, शेतकरीवर्ग आदी उपस्थित होते. असेच कोचुर येथील शेतकरी संतोष घनश्याम परदेशी यांचे दीड एकर क्षेत्रातील मका पिकाचे 1 लाखाचे नुकसान झाले,तसेच कांदेबाग,पिलबाग,जुनारी या केळी पिकाचे जवळ जवळ 1500 उभे पिक जमीनदोस्त झाले.ते दीड लाखाचे नुकसान झाले. मनोज परदेशी यांचे १५०० शे तयार केळी बागेतील खोड अक्षरशः उन्मळून पडले आहेत. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई करावी अशी मागणी केली.

काल झालेल्या वादळी वाऱ्या मूळे शेतीचे खूप नुकसान झाले असून मा.आ.चंद्रकांतभाऊ पाटील व प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी कोचुर येथील ग्रामपंचायत येथे शेतकऱ्यांना भेटून झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला व मदत पुनर्वसन खात्याचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांना फोन लावून लवकर जास्तीस जास्त मदत मिळावी अशी मागणी केली. तसेच शेतीची पहाणी केली व तहसीलदार यांना पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button