आटपाडी

भाजप विरोधी सरकारसाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा सादिक खाटीक यांची मागणी

भाजप विरोधी सरकारसाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा सादिक खाटीक यांची मागणी

राहुल खरात
आटपाडी
महाराष्ट्रामध्ये भाजपा विरोधी शिवसेना , राष्ट्रवादी कॉंग्रेस , काँग्रेस आय चे संयुक्त सरकार स्थापन व्हावे यासाठी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी पुढाकार घ्यावा अशी भावना मुस्लीम खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष सादिक खाटीक आटपाडी, यांनी श्रीयूत पवारांना पाठविलेल्या पत्राद्वारे व्यक्त केली आहे .

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दहा दिवस होत आले परंतू सर्वाधिक जागा मिळविणारा भारतीय जनता पक्ष सरकार बनविण्याचा दावा करू शकलेला नाही . गेल्या पाच वर्षात पुरती ससेहोलपट झालेल्या शिवसेनेने मतलबी भाजपला आपला न्याय हक्क आठवून देवून जेरीस आणले आहे . तथापि परतीच्या पावसाच्या दणक्याने मोडीस निघालेल्या शेती व्यवसायाबरोबर इतर अनेक महत्वपूर्ण प्रश्नांवर तातडीच्या निर्णयासाठी नवे सरकार लवकर अस्तित्वात येणे गरजेचे आहे .
देशातला विरोधी पक्ष मोडून निघाला पाहीजे , वन मॅन शो , टू मॅन आर्मी चे सरकार संघ परिवाराच्या इशाऱ्यावर आणि मनुस्मृतीच्या विचारधारेवर चालण्यासाठी सुरु असलेला आटापिटा रोखण्याची सुरुवात छत्रपतींच्या महाराष्ट्रातून सुरू होण्यासाठी भाजप विरोधकांनी एकत्र येणे ही काळाची अनिवार्य गरज ठरणार आहे .

शेतकरी , कामगार , नोकर वर्ग , हजारो उद्योग – उद्योजक यांना उघडयावर आणणाऱ्या आणि दलित , अल्पसंख्याक , सामान्य जनांना अनेक घटनांद्वारे भयभीत करण्याच्या भाजपाई वृतीला रोखत देशाला एकता – एकात्मतेचा संदेश देण्यासाठी छत्रपतींच्या वैचारीक वारसदार असणाऱ्या शिवसेना , राष्ट्रवादी कॉंग्रेस , आणि कॉंग्रेस आय यांची संयूक्तीक मोट बांधण्यासाठी पवार साहेबच यशस्वी होवू शकतात असा आत्मविश्वास सादिक खाटीक यांनी त्या पत्रात व्यक्त केला आहे .
देशाच्या कणखर नेत्या इंदिराजींनी घेतलेल्या आणीबाणीच्या निर्णयाचे समर्थन असो किंवा कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री ए.आर अंतुले सरकारला दिलेला पाठींबा असो किंवा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस विचारधारेचे उमेदवार प्रतिभाताई पाटील आणि प्रणब मुखर्जी यांच्या उमेदवारीस उघडपणे पाठींबा देणारी शिवसेनाप्रमुख दिवंगत आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेनाच होती . तसेच या तीन्ही पक्षासह देशातल्या अनेक पक्षामध्ये असलेले आदराचे स्थान लक्षात घेता शरद पवार साहेब करू शकणारी शिष्टाई देश – राज्य पातळीवरील काँग्रेसी नेत्यांना रुचणारी असल्याने त्यांनी संयुक्त सरकारसाठी घेतलेला पुढाकार राज्याच्या विकासाच्या हृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकतो असेही शेवटी खाटीक यांनी म्हंटले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button