Kolhapur

मानवा’धिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट , शाहू बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत शाहू महाराज जंयती संपन्न

मानवा’धिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट , शाहू बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत शाहू महाराज जंयती संपन्न
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट छत्रपती राजर्षी शाहू बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे राष्ट्रीय व छत्रपती राजर्षी शाहू बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद यासीन शेख व व मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजय पाटील यांच्या हस्ते महाराजांचे फोटो पूजन केले. याप्रसंगी सर्वांनी सर्व धर्म समभाव आचरणात आणण्याची शपथ घेतली. तसेच समाजातील दीनदलित , दुबळ्या लोकांना मदत करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प केला. राजर्षी घालून दिलेल्या नीतिमूल्यांचा वारसा जपण्याचं काम छत्रपती राजर्षी शाहू बहुउद्देशीय संस्था करत आहे. समाजातील जातीय विषमता दूर करून गोरगरिबांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ही संस्था करत आहे. समाजातील कोणत्याही व्यक्तीवर होणारे अन्यायाला वाचा फोडण्याचे अन्याय दूर करण्याचे काम मानव अधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट व छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था करत आहे. याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष महंमद यासीन शेख यांनी महाराजांचा आदर्श घेऊन त्यांच्या वाटेवरून चालण्याचा संकल्प केला आहे. या कार्यक्रमास मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट चे जिल्हाध्यक्ष व छत्रपती राजर्षी शाहू बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेचे सचिव संजय शिंदे मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे जिल्हा उपाध्यक्ष महेश नंदे व सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम लॉकडाऊन चे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button