Maharashtra

इंदापूरामध्ये १७ मे पर्यंत संचारबंदी कायम- सोनाली मेटकरी तहसिलदार

इंदापूरामध्ये १७ मे पर्यंत संचारबंदी कायम- सोनाली मेटकरी तहसिलदार

पुणे:इंदापूर शहरात सुदैवाने अद्याप पर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र शासन निर्णयाप्रमाणे इंदापुरात दि.१७मे पर्यंत संचारबंदी कायम ठेवणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. इंदापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दि. ५ मे रोजी तहसीलदार यांच्याशी संवाद साधला असता तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी वरील स्पष्टीकरण दिले. इंदापूरातील व्यापारी व नागरिकांनी शासकीय सूचनांचे पालन करण्याचे आवाहन तहसिलदार मेटकरी यांनी केले आहे.

इंदापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दि. ५ मे रोजी तहसीलदार मेटकरी यांची भेट घेऊन शहरातील सर्व दुकाने सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत दररोज रोज किंवा एकदिवसाआड सुरू ठेवण्याची मागणी केली. त्यावर सोनाली मेटकरी म्हणाल्या, आपण पुणे जिल्ह्यात येत असून पुणे, बारामती व तालुक्यातील भिगवण स्टेशन येथे १ कोरोना रुग्ण सापडल्यामुळे आपण डेंजर झोन मध्ये आहोत. काही ठिकाणी विलगीकरण झाल्यानंतर २० व्या दिवशी रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे संचारबंदी संपेपर्यंत सर्व व्यापाऱ्यांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. आतापर्यंत आपण सर्वांनी चांगले काम केले असून शेवटच्या १० दिवसासाठी आपण सावध राहणे गरजेचे आहे. त्यामुळे १७ मे पर्यंत इंदापूरात संचारबंदी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष भरत शहा, माजीनगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, इंदापूर जैन सोशलक्लबचे संस्थापक नरेंद गांधीसराफ, नामदेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गानबोटे, संतोष भागवत, बंडू बोत्रे, संतोष ढोले आदींनी व्यापाऱ्यांच्या अडचणी सांगितल्या तर उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, मिलींद दोशी, संजय जौंजाळ, पारसमल बागरेचा, इंदापूर रोटरी क्लब अध्यक्ष राकेश गानबोटे, श्रीनिवास बानकर, हरिदास गुजराती, राजेश जौंजाळ , भावेश ओसवाल आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button