Aurangabad

पैठण येथील नाथ महाराज मंदिर परिसरातील तीन दुकाने सील

पैठण येथील नाथ महाराज मंदिर परिसरातील तीन दुकाने सील

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट शमली असली तरी कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. औरंगाबाद ग्रामीणमध्ये कोरोना तिसऱ्या पायरीला असून कोरोना नियमावलीनुसार दुकाने, आस्थापने सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरू असतात तर शनिवार आणि रविवार फक्त अत्यावश्यक सेवा सुरू असतात.

असे असतानादेखील ग्रामीण भागात काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे अवैध रित्या वाळू उत्खनासंदर्भात पैठण येथील मोक्ष घाट येथे पहाणीसाठी गेले असता परिसरातील गोदावरी प्रसादलय, श्रीनाथ प्रसाद भांडार, व वैष्णवी पैठणी हॉलसेल हे आस्थापने सुरू असल्याची लक्षात येताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तातडीने दुकाने सील करण्याचे आदेश दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button