ट्रायबल फोरम पुणे जिल्हाध्यक्ष पदी रोहित सुपे, पुणे विभागिय अध्यक्षपदी दिलीप आंबवणे, राज्य कार्याध्यक्ष पदी डी बी घोडे
पुणे : पुणे जिल्ह्यात सामाजिक कार्यात नेहमिच सक्रिय असलेले तिरपाड ता. आंबेगाव येथील दिलीप आंबवणे यांची ट्रायबल फोरम पुणे विभागिय अध्यक्षपदी, तर राज्य कार्याध्यक्ष पदी डी. बी घोडे( गाव बोरघर ता आंबेगाव), पुणे जिल्हाध्यक्ष रोहित सुपे ( गाव साकुर्डी ता खेड) यांची निवड करण्यात आली आहे.
४ जुलै रोजी ट्रायबल फोरमचे राज्यस्तरीय आँनलाँईन अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात संस्थापक अध्यक्ष अँड. प्रमोद घोडाम यांनी ही निवड केली आहे. निवडीचे पत्र देण्यात आले. या प्रसंगी नाशिकचे सेवानिवृत्त केंद्रीय सनदी अधिकारी एकनाथ भोये,पुणेचे आदिवासी जमातींचे अभ्यासक मंजूर तडवी,आदिवासी विकास महामंडळ नाशिकच्या संचालिका मिनाक्षीताई वेट्टी, यवतमाळचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी
महेशकुमार सिडाम, मुंबईचे सदानंद गावित, रमेश परचाके,डॉ. दत्तात्रय दिघे,प्रा.चेतन गुराडा,पुणेचे डी.बी.घोडे, नाशिकचे हरीदास लोहकरे,नागपूरचे विवेक माळवी,पांढरकवडाचे रितेश परचाके आदि मान्यवर उपस्थित होते.
हे संघटन आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी ,अस्तित्व, अस्मिता आणि आत्मसन्मानासाठी तसेच संस्कृतीचे जतन व संवर्धन करुन,सांस्कृतिक घुसखोरी रोखण्यासाठी ट्रायबल फोरम या कँडरबेस शिस्तबध्द,वैचारिक असलेल्या फोरमची निर्मिती झाली असून समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध पातळ्यांवर काम करीत आहे. वैचारिक व शिस्त असलेल्या संघटनमध्ये निवड झाल्यामुळे परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे.
ते आपल्या निवडीचे श्रेय प्रफुल कोवे,अर्जुन युवनाते,डॉ.पंकज कुळसंगे , कासम सुरत्ने, शालिक मरसकोल्हे, सिमाताई मंगाम यांना देतात.