Pandharpur

उत्तम नियोजनामुळे स्वेरी अग्रेसर -प्रा. के.बी.कुलकर्णी स्वेरीत ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के२०’ स्पर्धा संपन्न

उत्तम नियोजनामुळे स्वेरी अग्रेसर -प्रा. के.बी.कुलकर्णी
स्वेरीत ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के२०’ स्पर्धा संपन्न

प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर- ‘आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये सोलापूर जिल्ह्याचा विचार केला असता स्वेरीमधील शैक्षणिक पद्धतीचे व ‘पंढरपूर पॅटर्न’चे अनुकरण करण्यासारखे आहे. नियोजन असो अथवा ‘पंढरपूर पॅटर्न’ शिक्षण पद्धत असो, याद्वारे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात दिवसेंदिवस भर पडून प्रगती साधली जात आहे. डॉ.रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक अभ्यासक्रमाचे नियोजन उत्तम पद्धतीने करून त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते. त्यामुळे स्वेरीच्या विद्यार्थ्यांना विशेष यश मिळत असते. या कारणांमुळे स्वेरीच्या प्रत्येक शैक्षणिक उपक्रमांकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते. प्रवेश प्रक्रियेमध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या संख्येने पूर्ण होते असे नाही तर ओव्हरफ्लो होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे स्वेरीतून मिळणाऱ्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो.’ असे प्रतिपादन सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्रा. के.बी.कुलकर्णी यांनी केले.
स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’ आणि ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ या विभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘इ स्क्वेअर -लॉजिक २ के २०’ कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी शासकीय महाविद्यालयाचे प्रा.कुलकर्णी मार्गदर्शन करत होते. दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.मीनाक्षी पवार यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा सांगून स्वेरीची यशोगाथा सांगितली. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागाच्या अल्पावधीत घेतलेल्या गरुडझेपेची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ म्हणाले की, ‘या स्पर्धांमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधन गुणांना व कल्पकतेला वाव देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले असून आपल्या सादरीकरणामधून नवीन प्रोजेक्ट, आयडिया सादर करता याव्या याच उद्देशाने अशा व्यासपीठाचा पूर्णपणे वापर केला पाहिजे. स्पर्धात्मक कार्यक्रम हे विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले एक व्यासपीठ असून आपल्यातील गुणवत्तेमुळे संशोधनाला गती येणार आहे.’ या राज्यस्तरीय उपक्रमात प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, आयडिया प्रेझेंटेशन आणि प्रोग्रामिंग मॅनिया अशा प्रकाराच्या स्पर्धा झाल्या. यातील विजेत्यांना रु.एक हजार पासून ते रु.सात हजार पर्यंतचे अशी एकूण साठ हजार रुपये पर्यंतची पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ.धनंजय चौधरी म्हणाले की, ‘एका नवीन विचारातून दुसऱ्या नवीन विचाराची निर्मिती होत असते. यासाठी विद्यार्थ्यांनी तांत्रिक संशोधनाकडेही अधिक लक्ष द्यावे. अशा स्पर्धेतून भविष्यात अनेक विद्यार्थी संशोधक म्हणून निर्माण होतील.’ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट संबंधीची सविस्तर माहिती देताना प्रा.डी.ए. कुंभार यांनी आत्तापर्यंत स्वेरीत आलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या आणि कंपन्यांसाठी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या याविषयी माहिती दिली. या एक दिवसीय तंत्रस्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयांतील जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी दोन्ही विभागातील प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. यावेळी चेतन विभूते, अक्षय सोळंखी, निखिल बिराजदार, मोहन भिमनपल्ली, स्वेरीचे अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग व स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते. प्रा गीता उन्हाळे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.पी.के. मगदूम यांनी आभार मानले.
छायाचित्र- १.व २. स्वेरीत ‘इ स्क्वेअर -लॉजिक २ के २०’ कार्यक्रमाचे उदघाटन करताना डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ सोबत सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्रा. के.बी.कुलकर्णी, चेतन विभूते, अक्षय सोळंखी, निखिल बिराजदार, मोहन भिमनपल्ली, समन्वयक डॉ.मीनाक्षी पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी. ३. मार्गदर्शन करताना सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्रा. के.बी.कुलकर्णी सोबत डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, चेतन विभूते, अक्षय सोळंखी, निखिल बिराजदार, मोहन भिमनपल्ली, समन्वयक डॉ. मीनाक्षी पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी मान्यवर.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button