Karnatak

महसूल विभाग व ग्रामपंचायत च्या वतीने फळ विक्रेतेना लस घेण्याचे आदेश…

महसूल विभाग व ग्रामपंचायत च्या वतीने फळ विक्रेतेना लस घेण्याचे आदेश…
महेश हुलसूरकर कर्नाटक
कर्नाटक : हुलसुर शहरातील महसूल विभाग व ग्रामपंचायत ने फळ विक्रेत्यांकडे लस घेण्यास सांगण्यात आले आहे तहसीलदार शिवानंद म्हेत्रे पीडीओ बी दंडिन, पीएसआय गौतम यांच्यासह आशा कार्यकर्ते हजर होते.
“एकाच दिवसात १४० लोकांना लसी दिली”
तहसीलदार शिवानंद म्हेत्रे म्हणाले की सरकारने दिलेल्या आदेशानुसार फळ व तरकारी विक्रेत्यांना ही लस अवश्य घेतली पाहिजे असे गुरुवारी ते शहरातील फळ विक्रेते व दुकानदारांशी बोलले
कोरोना महामारी अद्याप गेलेली नाही सर्वांनी शासनाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे आणि लॉक-डाऊन नियम पाळले पाहिजे येत्या ७ जूनपर्यंत अनावश्यकपणे घराबाहेर न येण्याचे त्यांनी जनतेला पटवून दिले काही तरुण मास्क न घेता बाहेर येत आहेत हे लक्षात येताच तहसीलदारांनी त्यांना बोलावून सांगितले की ते मास्क न घेता बाहेर येतील त्यांना फाईन लावण्यात येणार आहे
कुठल्याही प्रकारची भीक न बाळगता सर्वांनी लसी घ्यावी अशी माहिती त्यांना देण्यात आली.
पीएसआय गौतम यांच्याशी बोलले असता लसीला घाबरू नका हे सरकार आपल्या फायद्यासाठी आपल्याला सर्वोत्तम लस देत आहे त्यांनी निर्भयपणे लस घ्यावी असे त्यांनी जनतेला सांगितले.
गावात नागरिक जमा झाल्यानंतर तालुका पंचायत आवारात आरोग्य विभाग, महसूल विभाग, ता.पं. व जीआरएएम व आशा कामगारांच्या सहकार्याने एकाच दिवसात १४० लोकांना कोविड लस दिली गेली.
या वेळी नायब तहसीलदार संजुकुमारा बहिरे, महसूल अधिकारी मुनेश्वर स्वामी, पीडीओ बी. दंडिना, ग्रामसेवक नागराज यांच्यासह आशा कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button