Karnatak

दोन दुचाकी चोराना हुलसूर पोलिसांनी केली अटक

दोन दुचाकी चोराना हुलसूर पोलिसांनी केली अटक

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : हुलसूर व बसवकल्याण नगर पोलिसांची दुचाकी यशस्वी कारवाई करण्यात आली लाँक डाउन मध्ये घराबाहेर दुचाकी गाड्या लावून असलेल्या दुचाकी गाड्या चोरीचे प्रकरण दिवसेंदिवस वाढतच जात होते त्यामुळे हुलसूर व बसवकल्याण पोलिसांनी सापळा रचून दुचाकी चोरांना पकडले आहे.
हुलसूर व बसवकल्याण पोलिसांच्या पथकाने दोन अंतरंग चोरट्यांना अटक करण्यात आणि बसवकल्याण शहरासह शेजारच्या राज्यातील दुचाकी चोराना पकडण्यात यश मिळविले आहे.
हुलसूर तालुक्यातील बेलूर गावातील नागेश शिवराजा भोगे व भीमन्ना रमेश भोगे यांना अटक करण्यात आली इतर आरोपी लपून बसलेल्या शंकर या चोराच्या शोधत आहेत.
या आरोपींनी बसवकल्याण नगरसह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशसह शेजारच्या अनेक राज्यांमधून दुचाकी चोरी केल्याची माहिती मिळाली आहे.
एसपी डी.एल.नागेश, एएसपी डॉ.”गोपाल , हुमणाबादचे डीवायएसपी सोमालिंग कुंबार, सीपीआय जेएस नामेगौडर, बसवकल्याणा शहर स्टेशनचे पीएसआय गुरू पाटील आणि हुलसूर पीएसआय गौतम गुत्तेदार, प्रोबेशनरी पीएसआय दोन दुचाकी चोरांना कारवाईत अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलीस शिबंदी प्रशांत, विनोद सर आणि श्रीशैलगिरी यानी परिश्रम घेतले.
दुचाकी चोराकडुन ७ लाख रुपयांच्या ९ दुचाकी जप्त केल्याची माहिती मिळाली आहे, त्यापैकी एक बसवकल्याण शहरात चोरी केली गेली होती तर ८ हैदराबादमध्ये केल्याची माहिती दिली
याप्रकरणी हुलसूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button