Karnatak

बस्वराज बोम्मई यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

बस्वराज बोम्मई यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ


महेश हुलसूरकर कर्नाटक


कर्नाटक : कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून बस्वराज सोमंप्पा बोम्मई यांनी आज कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ बंगळूर येथील राज भवनात घेतली.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर बंगळूर येथील भाजपाच्या कार्यालयात विधिमंडळ दलाची एक बैठक घेण्यात आली या बैठकीत नेतेपदी बस्वराज बोम्मई यांची निवड केली व या नावाची चर्चा सुरू झाली होती पण अखेरीस भाजपचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी किशन रेड्डी यांनी या बैठकीत बस्वराज बोम्मई यांच्या नावाची घोषणा केली.
बस्वराज बोम्मई हे विधान परिषदेचे दोन वेळेस आमदार म्हणून निवडून आलेले आहेत तर ते हावेरी उडपी शिगगाव जिल्हाचे ते सध्या प्रतिनिधीत्व करतात ते माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा खात्याचे कारभार सांभाळला तर नंतर ते थेट ग्रहमंत्रीपदाची ही जबाबदारी सांभाळली होती आज कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button