Karnatak

सोयाबीन बियाणे खरेदी साठी नागरिकांनी लावली रात्री पासून रांग

सोयाबीन बियाणे खरेदी साठी नागरिकांनी लावली रात्री पासून रांग

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : हुलसूर पासून जवळच असलेल्या भाल्की तालुक्यातील आळवाई येथील घटना अशी की शेतकरी संपर्क केंद्राकडून दि.६ रोजी रविवारी हलगी लावून दवंडी देण्यात आली होती की सोमवारी सकाळी लवकर शेतकरी संपर्क केंद्रात सोयाबीन बियाणे देण्यात येणार आहे म्हणून दिल्याने नागरिक रविवारी रात्री ८ वाजल्यापासून सरकारी शाळेत उतरवलेल्या शाळेच्या आवारात महिला पुरुष सुमारे १०० ते १५० एकत्र रांग लावून सकाळी शेतकरी संपर्क केंद्र उघडण्याची वाट रात्रभर पाहत बसण्याची वेळ शेतकरी वर्गावर आलेले ही वेळ लाजिरवाणी खूप आहे.
शेतकऱ्यांना अशा परिस्थितीत पाहणे ही कर्नाटकातील पहिलीच वेळ असे नागरिक बोलत होते काही शेतकरी अशा चिंतेत होते की रात्री जर नाही थांबलो तर सोयाबीन बियाणे मिळनार नाही नाही मिळाले तर पेरणी करायची काय व मुला बाळाला घालायचे काय अशा चिंतेत महिला नागरिक थांबले होते गावातील सुजाण अथवा ग्रामपंचायत सदस्य व नेते हे सर्व पाहून मुग गिळून गप्प का बसले असावे हे ही लाजिरवाणी गोष्ट आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button