Karnatak

Crime Diary…. ही आहे देशातली खरतनाक सीरियल किलर..सायनाईड मल्लिका..!

Crime Diary…. ही आहे देशातली खरतनाक सीरियल किलर..सायनाईड मल्लिका..!

स्त्री मुळातच जन्मजातच सनातनी वृत्तीची असते.संवेदनशील, सोशिक,हळवी अशी स्त्री वेळ आल्यावर अत्यन्त भयानक रूप देखील घेऊ शकते.जेंव्हा जेंव्हा स्त्रीचा आत्मसन्मान आणि स्व अस्तित्व धोक्यात येत तेंव्हा ती अत्यन्त कठोर व खतरनाक रूप धारण करू शकते.सहजासहजी स्त्री तिचा सोशिक पणा सोडत नाही. आणि टोकाचे निर्णय घेऊन तिचे उग्र रूप देखील दाखवत नाही.पण आज आपण अश्या एका स्त्री बद्दल जाणून घेणार आहोत की जिची कोणतीही मजबुरी किंवा गरज नसताना तिने अनेक जणांचे जीव घेतले.अशी एक सिरीयल किलर जिच्या नावावर अनेक खून आहेत.

या महिलेने दागिने चोरी करण्यासाठी चक्क महिलांना सायनाईड खाऊ घालून जीवे मारले. विशेष म्हणजे देवाधर्माच्या नावाने तिने महिलांना जाळ्यात ओढून हे सर्व कृत्य केलं. या सिरिअल किलर महिलेचं नाव के. डी. केंपम्मा असं आहे. पण ती सायनाईड मल्लिका म्हणून कुप्रसिद्ध आहे.

स्त्रियांच्या भावनिक स्वभावाचा घेतला फायदा

ह्या महिलेचं खरं नाव के. डी. केंपम्मा असं आहे. या केंपम्माने अनेक महिलांचा जीव घेतला.2007 मध्ये तिच्या क्रूर कर्माच्या कहाण्या प्रचंड गाजल्या. ही केंपम्मा श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय महिलांना मंदिरांमध्ये हेरायची. त्यांच्याशी गोड बोलून त्यांचे दु:ख समजून घ्यायची. त्यांना भावनिक गोष्टींमध्ये गुंतवायची. नंतर शहर-गावाबाहेर कुठल्यातरी मंदिरात किंवा महिलांच्या घरात पुजेच्या नावाने फसवायची. ती महिलांना तीर्थ प्रसाद म्हणून जबरदस्ती सायनाईड खायला लावायची. त्यानंतर महिलांचा मृत्यू झाला की त्यांच्या गळ्यातील किंवा अंगावरील सर्व दागिने लंपास करायची. अखेर 2007 मध्ये ती पकडली गेली. त्यानंतर तिचे गैरकृत्य उघड झाले. केंपम्मा महिलांना सायनाईड खाऊ घालून मारायची त्यामुळेच तिला सायनाईड मल्लिका नाव पडलं.

कोण आहे सायनाईड मल्लिका

केंपम्मा उर्फ सायनाईड मल्लिका ही मुळची कर्नाटकाची असून कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरु जवळील काग्गलीपुरा हे तिचं गाव. या केंपम्मा हिचा नवरा व्यवसायाने टेलर होता. तर तिचा चिट फंडचा व्यवसाय होता. पण त्या व्यवसायात तिचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे तिच्या पतीने तिला रागाच्या भरात घराबाहेर काढलं. त्यावेळी केंपम्मा हिला मुलबाळ नव्हतं. पतीने घराबाहेर काढल्यानंतर तिने अनेक ठिकाणी कामवालीबाई किंवा सोनाराकडे मदतनीस म्हणून काम केलं. या दरम्यान तिने अनेक ठिकाणी चोऱ्यामोऱ्या केल्या. सोनाराकडे काम करताना तिचं सायनाईडची माहिती मिळाली.सोनार सोनं साफ करण्यासाठी या द्रव्याचा वापर करतात. ते पिलं तर माणूस मरतो हे तिला ठावूक झालं. याच महितीचा वापर करुन तिने हत्येचं सत्र सुरु केलं.

मंदिर बनलं जाळ्यात अडकविण्याचे ठिकाण

सायनाईड मल्लिका मंदिरात जात असे. तिथे आलेल्या हतबल महिलांना गाठायची. आपल्याला धार्मिक कार्यक्रम, पुजा-पाठची खूप माहिती आहे, असं महिलांना सांगून त्या निमित्ताने त्या महिलांशी संपर्क करायची. त्यांना भावनिक गोष्टींमध्ये गुंतवायची. हळहळू त्यांच्याशी जवळीक वाढवायची. त्यानंतर आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्यातरी पूजेची माहिती महिलांना द्यायची. घराबाहेर किंवा शहराबाहेर असलेल्या एखाद्या मंदिरात ती पूजेचं आयोजन करायची. तिथे ती महिलांना सायनाईड तीर्थ म्हणून पाजवायची. नंतर महिलांचा मृत्यू झाल्यानंतर महिलांच्या अंगावरील दागिने पळवायची. त्यानंतर ती दुसरीकडे राहायला जायचे. तिथे नवीन व्यक्ती आणि नवं नाव घेऊन वावरायची आणि पुन्हा एखाद्या महिलेला जाळ्यात ओढायची.

मल्लिकाला जन्मठेपेची शिक्षा

या सायनाईड मल्लिकाने ऑक्टोबर 1999 मध्ये पहिला खून केला होता. विशेष म्हणजे 2007 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यात तिने चक्क पाच खून केले होते. मृतक महिला या 30, 52 तसेच 60 वयाच्या होत्या. 2007 मध्ये चोरीचं सोनं विकल्याप्रकरणी ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली होती. त्यावेळी पोलिसांना तिच्याजवळ काही महिलांचे दागिने सापडले होते. त्यावेळी केलेल्या चौकशीत सहा महिलांचा तिने खून केल्याचं उघड झाल. तिला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. पण पुढे खटला सुरु असताना परिस्थितीजन्य पुरावे असल्या कारनाने तिच्या फाशीच्या शिक्षेचं रुपांतर जन्मठेपेत करण्यात आल.

हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे सावध रहा.. आजूबाजूला आपल्या सर्वच लोक चांगले असतील असे नाही. कोणीही कशाही पध्दतीने फसवू शकतो.कोणतेही धर्म स्थळ हे सर्वात जास्त फसवनुक करण्याचे ठिकाण बनू शकते.कारण इथे श्रद्धेने आलेला व्यक्ती आधीच हळवा होऊन भावनिक मनाने आलेला असतो.धर्म स्थळा जवळील प्रत्येक व्यक्तीला तो ईश्वराचा प्रतिनिधी समजत असतो.इथे आपली फसवणूक होणार नाही अशी खात्री असते.पण बघा चप्पल सर्वात जास्त प्रमाणात धार्मिक स्थळांमधूनच चोरीस जातात.मल्लिकाने देखील अश्याच भोळ्या व हतबल महिलांचा फायदा घेत फक्त चोरी नाही केली तर जिवा निशी अनेक महिलांना मारून टाकलं. असो तिची स्टोरी सांगण्यामागचं खरं कारण हेच की आपल्या आजूबाजूला असे हजारो शेकडो माणसं खोटे मुखवटे घेऊन फिरत असतात. त्यांना ओळखा आणि सावध व्हा. आपण भोळेपणात त्यांना आपली दु:ख सांगताना,विश्वास करताना दहा वेळा विचार करा..

संबंधित लेख

Back to top button