Yawal

आर्मीतून सेवानिवृत्तीच्या जवानाचे यावल मध्ये उत्साहात जल्लोषात छत्रपती फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वागत

आर्मीतून सेवानिवृत्तीच्या जवानाचे यावल मध्ये उत्साहात जल्लोषात छत्रपती फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वागत

शब्बीर खान यावल

यावल : नायक महेंद्र पंडित पाटील राहणार कोरपावली हे भारतीय सैन्य दलात नायक पदावर कार्यरत होते ते दिनांक 30/ 9 /2021 रोजी सैन्यदलात तुन आर्मीतून नायक या पदावरून सेवानिवृत्त झालेत त्यांचे यावल मध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले दिनांक 25 सप्टेंबर 2001 रोजी जळगावला आर्मी भरती मध्ये भरती झाले होते ट्रेनिंग नंतर त्यांनी भारतातील विविध राज्यांमध्ये सेवा दिली ज्यात राजस्थान, जम्मू-काश्मीर ,गुजरात ,जम्मू काश्मीर, राजस्थान ,जोधपुर ,आसाम, युपी, अशा राज्यांमध्ये वीस वर्ष सेवा देऊन दिनांक 30/ 9 /2021रोजी रिटायर होऊन आपल्या गावी येत असताना यावल मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कथा छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन चे अध्यक्ष व विरावली ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य एडवोकेट देवकांत पाटील दिनकर पाटील विरावली विकास सोसायटीचे माजी चेअरमन संजय पाटील नायगाव शाळेचे उपशिक्षक बी डी पाटील सर विरावली गावातील माजी सैनिक अर्जुनराव पाटील छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन चे संचालक गिरीश पाटील विरावली गावातील जेष्ठ नागरिक आत्माराम धनगर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राकेश सोनार कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे हितेश गजरे .गोलू माळी .कोरपावली गावचे भरत चौधरी. वाढोदा ग्रामपंचायत सदस्य लीलाधर भाऊ .कोडवद गावातील समाजसेवक किशोर पाटील अक्षय पाटील. या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अनिकेत सरोटे . या सर्वांनी महेंद्र पंडित पाटील व त्यांच्या सौभाग्यवती यांच्यासह सर्व परिवाराचे मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ पुष्पहार भारत मातेची प्रतिमा सप्रेम भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती फाउंडेशन च्या वतीने देवकांत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी केले होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button