Pune

शैक्षणिक व सामाजिक कार्य करणा-या गटशिक्षणाधिकारी अशोकजी बि-हाडे यांचे पीआरसीने केले अभिनंदन !

शैक्षणिक व सामाजिक कार्य करणा-या गटशिक्षणाधिकारी अशोकजी बि-हाडे
यांचे पीआरसीने केले अभिनंदन !

अमळनेर महाराष्ट्र म्हटला की त्याला पुरोगामी विचाराची जोड असलेले राज्य अनेक पुरोगामी विचारांवर निष्ठा असलेले लोक महाराष्ट्रात कार्य करीत आहे. अशाच एक अधिका-याबाबत म्हणता येईल. शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी झटणा-या श्री. अशोकजी बि-हाडे यांचे उपक्रमशील प्रयत्नवादी कार्यकुशल गटशिक्षणाधिकारी म्हणुन पंचायत राज कमिटीने स्वागत करुन अभिनंदनाचा ठराव पास केला.

आपल्या गरिब परिस्थितीची तमा न बाळगता शिक्षण घेऊन प्राथमिक शिक्षकाची नोकरी स्विकारलेल्या होतकरु गुरुजींचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण पार करुन अधिकारी होण्याचे स्वप्न पुरे झाले. विस्तार अधिकारी पासुन प्रगत होणारा प्रवास थेट गटशिक्षणाधिकारी पर्यत पोहचला.ह्या कालखंडात त्यांनी अनेक शैक्षणिक उपक्रम राबवुन कर्त्यव्यदक्ष अधिकारी म्हणुन ख्याती मिळविली. अगदी अभ्यासु व्यक्तिमत्व म्हणुन ते सर्वाना परिचीत आहे. विविध विचारवंताच्या विचारावर ते सखोल मार्गदर्शन करुन तरुणाईला तेजस्वी दिशा देतात.सत्यशोधक विचारांवर त्यांनी अनेक भाषणे देऊन म. फुले यांच्या विचाराची वैचारीक भुमिकाअसलेले शिक्षक घडविले. पुरोगामी चळवळीत तन,मन,धन अर्पण करुन वैचारीक क्रांत्रीला हातभार लावला. शैक्षणिक कार्यात त्यांनी काटेकोरपणे प्रशासन करुन आनंददायी वातावरणाने,
सर्वाच्या सहकार्याने शैक्षणिक विचार संबधितांपर्यत पोहचविला.विविध प्रबोधने,लेख यांच्यामार्फत त्यांनी सामाजिक जनजागृतीचे कार्य अविरत चालु ठेवले आहे. अनेक संकटे आलीत परंतु त्यांना लाभलेल्या क्रातिकारी विचारांचा वारसा त्यामुळे
त्यांनी दुखः ला बाजुला सावरुन पुन्हा आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला वाहुन घेतले त्यांच्या ह्या प्रेमाने आपुलकीने मानवतेच्या दृष्टीकोणातुन केलेल्या कामाचे कौतुक पंचायत राज कमेटीने जाहिर बोलुन दाखविले.
त्यांचा हजरजबाबीपणा व कार्यकुशलतेला अखेर न्याय मिळाला ह्या सहुदयी व्यक्तिलाअधिकारी, शिक्षक, संस्थाचालक,हितचिंतक , पत्रकारमित्र परिवाराकडून सर्वत्र कौतुक केले जात आहे.
दैनिक शब्दगंगाचे देवेंद्र पाटील संपादक ,कार्यकारी संपादकबी.एन .बिरारी,अमळनेर तालुका प्रतिनिधी ईश्वर महाजन व शब्दगंगा परीवाराच्या वतीने गटशिक्षणाधिकारी अशोक बि-हाडे यांचे अभिनंदन करीत भावीवाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button