Amalner

? Big Breaking..माजी नगराध्यक्ष विनोद पाटील यांनी रस्ता विकत घेतला आहे? नगरपरिषदेने त्यांना भाडे तत्वावर दिला आहे? की भेट दिला आहे? सामान्य जनतेला पडला प्रश्न

माजी नगराध्यक्ष विनोद पाटील यांनी रस्ता विकत घेतला आहे की नगरपरिषदेने त्यांना भाडे तत्वावर दिला आहे? की भेट दिला आहे?सामान्य जनतेला पडला प्रश्न

अमळनेर येथील सिद्धिविनायक कॉलनी येथे माजी नगराध्यक्ष विनोद पाटील यांचा टोलेजंग बंगला आहे.आता ह्या बंगल्यात राहायला जागा अपूर्ण पडते म्हणून किंवा इतर काही कारणांमुळे त्यांनी रस्त्यावर लोखंडी पाईप टाकून त्याला जाळी बसवून जवळपास अर्धा रस्ता ताब्यात घेतला आहे.नुकतेच नगरपरिषदेने रस्ता रुंदीकरण च्या नावाखाली अनेक लोकांचे अतिक्रमण शासनाचे आदेश नसताना (शासन निर्णय आहे माझ्या जवळ) काढले.काही गरीब गरजू लोकांचे व्यवसाय त्यामुळे बंद पडले.या आधीही नगरपरिषदेने शासकीय बडगा अतिक्रमणे जबरदस्तीने काढून सामान्य जनतेला वेठीस धरले आहे.विशेष म्हणजे कोणत्याही धन दांडग्या चे अतिक्रमण काढायची हिम्मत नगरपरिषदेच्या अधिकारी कर्मचारी किंवा लोक प्रतिनिधींमध्ये नाही.

आता एक नवीन उदा समोर आले आहे ते म्हणजे सिद्धी विनायक कॉलनीत महिला महाविद्यालयाच्या समोर असलेल्या शहरातील नामांकित उद्योग पती माजी नगराध्यक्ष विनोद पाटील यांचा जंगी बंगला अस्तित्वात आहे. आता ह्या बंगल्याच्या घरासमोरील रस्त्यावर अर्धा रस्ता भर लोखंडी पाईप टाकून त्याला जाळी बसविण्यात आली आहे. तसेच गाडी देखील पार्क करण्यात येत आहे. आता प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की ही सवलत उद्योग पती विनोद पाटील यांना का? रस्ता अडविण्याचा त्यावर अतिक्रमण करण्याचा अधिकार त्यांना आहे का? की नगरपरिषदेने त्यांना भाडे तत्वावर हा रस्ता दिला आहे? की त्यांनी रीतसर खरेदी केला आहे?की नगरपरिषदेने सार्वजनिक असलेला रस्ता भेट स्वरूपात दिला आहे? नेमका प्रकार काय आहे?कारण जवळपास अर्धा रस्ता बंद झाल्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होत आहे. विशेष म्हणजे समोरच दवाखाना असून सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.त्याच बरोबर समोर महाविद्यालय देखील असुन कर्मचाऱ्यांना ही त्रास होत आहे.

? Big Breaking..माजी नगराध्यक्ष विनोद पाटील यांनी रस्ता विकत घेतला आहे? नगरपरिषदेने त्यांना भाडे तत्वावर दिला आहे? की भेट दिला आहे? सामान्य जनतेला पडला प्रश्न

विशेष म्हणजे हा रस्ता अत्यन्त खराब झालेला आहे खूप मोठ्या प्रमाणात ह्या रस्त्यावर खड्डे आहेत. पावसाचे पाणी निचरा होत नाही. दुसरे महत्वाचे म्हणजे ह्या विनोद पाटील यांनी त्यांच्या बाजूचा रस्ता स्वखर्चाने उंच करून घेतला आहे आणि त्यामुळे सर्व पावसाचे पाणी हे दवाखाना आणि महाविद्यालय परिसरात जमते वारंवार तक्रार करूनही नगरपरिषद प्रशासनाने यावर काहीही कार्यवाही केली नाही.खराब रस्ता दुरुस्त करण्यासाठी मात्र मा माजी नगराध्यक्ष ह्यांनी आजपर्यंत कोणतेही प्रयत्न केले नाहीत.स्वतःचे राजकीय वजन लोकांसाठी वापरले नाही.शब्द खर्च केला नाही आणि आता अर्धा रस्ताच ताब्यात घेऊन नगरपरिषद प्रशासन त्यांच्या वर किती मेहरबान आहे याचा पुरावाच देऊन टाकला आहे.परिसरातील अनेक जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी विरोध दर्शवत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button