Mumbai

Mumbai: कोरोना Update… राज्यात लवकरच कठोर निर्बंध…! काल आढळले तब्बल 36 हजार रुग्ण…!

Mumbai: कोरोना Update… राज्यात लवकरच कठोर निर्बंध…!काल आढळले तब्बल 36 हजार रुग्ण…!

दिवसागणिक कोरोनाचं संकट मुंबईसह राज्यावरही गहिरं होत चाललंय. त्यामुळे आता कठोर निर्बंधांचा सामना आपल्याला करावा लागण्याची शक्यता आहे. काल दिवसभरात कोरोनाच्या आकडेवारीनं अचानक उसळी घेतल्यानं आज राज्यात कठोर निर्बंध जारी होण्याची शक्यता आहे. काल राज्यात तब्बल ३६ हजार २६५ नवे कोरोना रुग्ण आढळलेयत… तर दुसरीकडे मुंबईत देखिल कोरोना रुग्णांच्या संख्येनं काल २० हजारांचा आकडा पार केलाय. मुंबईत काल २० हजार १८१ नवे रुग्ण आढळलेयत. मुंबईतील लोकसंख्या २० हजारांच्या पुढे गेल्यानंतर लॉकडाऊन असेल असा इशारा आयुक्तांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आता मुंबईसंदर्भातही आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्र्यांनी जरी संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता फेटाळली असली तरी वीकेंड लॉकडाऊनची चर्चा मात्र सुरू झालेय. याशिवाय रात्रीची संचारबंदी लागू केली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button