Dindori

थोरात विद्यालयात स्वांतत्र्य दिन उत्साहात साजरा.

थोरात विद्यालयात स्वांतत्र्य दिन उत्साहात साजरा.

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

(स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिम्मित विद्यालयात निबंध, वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला स्पर्धेचे आयोजन)
मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनिअर काॅलेज मोहाडी विद्यालयात ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बाळासाहेब अडसरे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब अडसरे यांनी केले.आपल्या भाषणातुन त्यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या व राष्ट्रपुरूषाच्या कार्याचा गौरव केला.देशाची अंखडता टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आव्हान केले.
यावेळी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण प्राचार्य बाळासाहेब अडसरे यांनी केले व स्काउट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण पर्यवेक्षिका प्रमिला देशमुख यांनी केले.यावेळी व्यासपीठावर शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश कळमकर,विलास पाटील,शहाजी सोमवंशी, अनिल निकम,नंदकुमार डिंगोरे,रंगनाथ घोलप,सुदाम पाटील,बबन जाधव, लक्ष्मण देशमुख,जयेश घुमरे,दिलीप जाधव,सुधाभाऊ सोमवंशी,डाॅ.चंद्रकांत पाटील,यशवंत मौले ,एल टी गुरूजी,शिवाजी जाधव,राजाराम देशमुख,चंद्रभान कळमकर,सर्जेराव देशमुख,सुरेश जाधव,प्राचार्य बाळासाहेब अडसरे, पर्यवेक्षिका प्रमिला देशमुख, अभिनवच्या मुख्याध्यापिका सोनाली देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
केल
विद्यालयाचे संगीत शिक्षक दिलीप पागेरे व गीतमंचने राष्ट्रगीत,ध्वजगीत व देशभक्तिपर गीत सादर केले.इयत्ता तिसरी ची विद्यार्थिनी अदिती जाधव हिने भारतीय स्वातंत्र्य लढ्याविषयी व महापुरुषांच्या योगदानाविषयी माहिती दिली.अभिनवच्या विद्यार्थ्यांनी सुंदर संचलन केले.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त निबंध,वक्तृत्व व रांगोळी स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवुन गौरवण्यात आले.देशसेवा देणा-या माजी सैनिकांचा यावेळी विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास पर्यवेक्षिका प्रमिला देशमुख,अभिनवच्या मुख्याध्यापिका सोनाली देशमुख,सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडाशिक्षिका सोनाली खरात, प्रदीप जाधव व सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामनाथ गडाख यांनी केले व आभार प्रदर्शन शरद निकम यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button