Arondol

झाडे लावा झाडे जगवा , मुली वाचवा – मुली शिकवा मग मराठी वाचवा – मराठी जगवा – चळवळ व्हावी एरंडोलला बस आगारात मराठी राजभाषा दिन साजरा

झाडे लावा झाडे जगवा , मुली वाचवा – मुली शिकवा मग मराठी वाचवा – मराठी जगवा – चळवळ व्हावी एरंडोलला बस आगारात मराठी राजभाषा दिन साजरा

विक्की खोकरे एरंडोल

एरंडोल : झाडे लावा झाडे जगवा , मुली वाचवा – मुली शिकवा मग मराठी वाचवा – मराठी जगवा – चळवळ व्हावी एरंडोलला बस आगारात मराठी राजभाषा दिन कार्यक्रमात प्रा . शिवाजीराव अहिरराव यांचे प्रतिपादन एरंडोल ( ) – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसूमाग्रज तथा तात्यासाहेब वि . वा . शिरवाडकर यांचा जन्मदिवस राज्यात मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो . एरंडोल बस आगारात देखील दरवर्षी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो . यावर्षीच्या कार्यक्रमात एरंडोल आगारप्रमुख विजय पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा निवृत्त प्रा . शिवाजीराव अहिरराव , ज्येष्ठ नगरसेवक डॉ . सुरेश पाटील . यावेळी प्रा . अहिरराव यांनी मराठीचा -हास थांबव प्रत्येक घरात मराठीचा वापर , वाचन , लेखन व्हावे तसेच ज्याप्रमाणे पर्यावरणासाठी झाडे लावा – झाडे जगवा तसेच मुलींसाठी मुली वाचवा – मुली शिकवा या आवश्यक गोष्टी असून शासन देखील सहकार्य करीत असते . त्याचप्रमाणे मराठीचा सन्मान होण्यासाठी , न्हास थांबविण्यासाठी मराठी वाचवा – मराठी जगवा ही चळवळ व्हावी असे प्रतिपादन केले . अध्यक्षपदावरून बोलतांना आगारप्रमुख विजय पाटील यांनी सांगितले की , बस कर्मचारी , वाहक , चालक सर्वच मराठीचा वापर करतात . प्रवाशांशी सौजन्याने मराठीत बोलतात . यापुढे देखील मराठीचा वापर कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त करून उपस्थित ज्येष्ठ नागरीक , महिलांना गुलाबपुष्प आणि पेढे देवून सत्कार केला . संत रविदास महाराज यांच्या कार्याचा गौरव केला . कार्यक्रमाच्या सुरूवातीस वि . वा . शिरवाडकर आणि संत रविदास महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी वंदन केले . कार्यक्रमाचे आभार आणि सूत्रसंचलन स्थानकप्रमुख गोविंद बागुल यांनी केले . कार्यक्रमासाठी यंत्र अभियंता जयेश पाटील , बागले मॅडम , बिर्ला मॅडम , सतीष महाजन , विलास पाटील यांचेसह प्रवासी , नागरीक , कर्मचारी उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button