Arondol

कलाशिक्षक ज्ञानेश्वर माळी रेखांकित स्वतःचे स्केच पाहून फर्डे वक्ते शब्दप्रभू माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी झाले निःशब्द !!!

कलाशिक्षक ज्ञानेश्वर माळी रेखांकित स्वतःचे स्केच पाहून फर्डे वक्ते शब्दप्रभू माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी झाले निःशब्द !!!

एरंडोल : कासोदा ता ,एरंडोल आर्यन एज्युकेशन सोसायटी,पालघर (कोकण ) येथील म.नी.दांडेकर विद्यालयाचे कलाशिक्षक ज्ञानेश्वर माळी यांनी सपत्नीक चोपडा येथे प्रत्यक्ष जाऊन महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय नेते प्रा.अरुणभाई गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पेन्सिल स्केच सविनय स्नेह भेट दिले.स्केचमध्ये अरुणभाईंचे चैतन्यदायी सदाबहार हास्य …. डोळ्यातून ओसंडून वाहणारा अदम्य
आत्मविश्वास …. मांगल्यपूर्ण कुलीन मनोवेधक विद्वत्ता …. माळींनी भाईंच्या व्यक्तिमत्वाचे अंतर्बाह्य दर्शन जादुई रेषांनी अप्रतिम साकारले ! बिंबाहून प्रतिबिंब सरस या संभ्रमाने भाई फर्डे वक्ते असूनही चक्क अवाक होऊन निःशब्द झाले ! उपस्थितांनी माळी यांना कौतुकांच्या प्रतिक्रियांनी अक्षरशः न्हाऊ घातले ! याप्रसंगी दि चोपडा बॅंकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी,जेष्ठ उद्योजक आशिषशेठ गुजराथी,प्रसन्नभाई गुजराथी,प्रा.आशिष गुजराथी,प्राचार्य राजेंद्र महाजन (ललित कला केंद्र चोपडा ),प्रा.विनोद पाटील,जागतिक पातळीवरील प्रसिद्ध कळसूत्रकार प्रा.दिनेश साळुंके,अक्षरशिल्पी जेष्ठ कलाशिक्षक वसंत नागपुरे,मिलिंद शहा,भगवान बारी, प्रविण मानकरी,अतुल अडावदकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.कलाशिक्षक माळी यांनी कोरोना लाॅकडाऊन काळात महाराष्ट्रातील १०० च्या वर मान्यवरांची व्यक्तिरेखाटने काढली. समर्पित सेवा कलेतून करीत राष्ट्र सेवेचा आदर्श कलाशिक्षकांसमोर विनम्रतेतून माळी यांनी ठेवला आहे.रेखाटनातून प्राप्त एकूण रुपये ११,१११ त्यांनी कोविड १९- मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणगी दिली.या १०० व्यक्तिरेखांकनांचे *”शतचित्राणी”* हे आगळेवेगळे पुस्तक स्नेही शिक्षक रविंद्र नाईक ( स.तु.कदम विद्यालय,पालघर ) यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ बंधू आर्किटेक्ट प्रमोद माळी व गुरुवर्य प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्या कलात्मक अमूल्य मार्गदर्शनाने लवकरच जळगाव येथील अथर्व प्रकाशन मार्फत प्रकाशक युवराज माळी व सौ.संगिता माळी प्रकाशित करीत आहे.प्रकाशनास आर्यन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भास्कर उसपकर,संस्थेचे विश्वस्त भास्कर हाटे व गॉडफादर ज्ञानेश्वर कानडे, सेवानिवृत्त कलाशिक्षक प्रफुल्ल घरत,(माजी अध्यक्ष,पालघर जिल्हा कलाध्यापक संघ)प्रमोद पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.ज्ञानेश्वर माळी यांना अखिल भारतीय कलाध्यापक संघांमार्फत सांगली येथील राज्य अधिवेशनात ‘आदर्श कलाशिक्षक पुरस्कार ‘ प्राप्त झालेला आहे.पालघर रेल्वे स्टेशनचा परिसर त्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने सुशोभित केला आहे.गरीब विद्यार्थ्यांना मदत, पूरग्रस्तांना मदत,मुक्या प्राण्यांना जीवनदान,रक्तदान शिबिर आयोजन,समाज प्रबोधनात्मक उपक्रम इ.माळी सरांनी यशस्वीपणे राबवून परिसर कलामय केला आहे. ज्ञानेश्वर माळी यांचा व्यक्तिचित्रण,निसर्गचित्रण,ती चित्रणात हातखंडा आहे. ज्ञानेश्वर कौतिक माळी हे ललित कला केंद्र चोपडा या ग्रामीण भागातील मात्र महाराष्ट्रभर नावाजलेल्या कलासंस्थेचे सन १९९५ ते २००१ बॅचचे माजी विद्यार्थी आहेत.त्यांच्या *शतचित्राणी* व्यक्तिरेखांकन प्रस्तावित पुस्तकांचे अरुणभाई गुजराथी साहेबांनी व्रतस्थ कलाशिक्षक माळी यांना कौतुकाची थाप देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button