Arondol

एरंडोल तालुक्यातील रिक्षाचालकांचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मदत केंद्राचे उद्घाटन…

एरंडोल तालुक्यातील रिक्षाचालकांचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मदत केंद्राचे उद्घाटन…

एरंडोल : तालुक्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना शासनाने जाहीर केलेल्या योजनेप्रमाणे पंधराशे रुपये मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी मदत कक्षाचे उद्घाटन एरंडोल नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, इंदिरा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय महाजन, स्टेट बँक शाखा व्यवस्थापक आशीष मेढे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रिय, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय चौधरी सामाजिक कार्यकर्ते फकीरा खोकरे हे होते.
शासनाच्या योजनेला कर्तुत्वाची जोड हा मंत्र डोळ्यासमोर ठेवून आरोग्यदूत विक्की खोकरे यांनी मदत कक्ष सुरू केले आहे.
कोरोणा महामारी च्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानाधारक रिक्षाचालक बांधवांसाठी पंधराशे रुपयाचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने एरंडोल शहर व तालुक्यातील परवानाधारक रिक्षा चालक बांधवांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मदत कक्ष सुरू करीत आहे असे प्रास्ताविकात आरोग्य दूत विक्की खोकरे यांनी म्हटले.
रिक्षाचालक बांधवांसाठी सुरु करण्यात आलेल्या मदत कक्षाचे हे कार्य कौतुकास्पद आहे. तरी योजनेचा लाभ सर्व रिक्षाचालक बांधवांनी घ्यावा व या ठिकाणी घेऊन सर्वांनी आपल्या आपले कागदपत्रे दाखवून ऑनलाईन अर्ज दाखल करून घ्यावा असे नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी म्हटले.
कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ, व पुष्पहार देऊन विकी खोकरे यांनी सर्वांचे स्वागत केले.यावेळी निलेश परदेशी,पप्पू चौधरी, अजय चौधरी यांचेसह अन्य रिक्षा चालक बांधवाचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले.
ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी सुनील मराठे, रितेश नेवे हे विशेष परिश्रम घेत असल्यामुळे मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे त्यांना कोरोना योध्या म्हणून सन्मानित करण्यात आले.

फोटो ओळ :- एरंडोल येथे रिक्षाचालक बांधवांसाठी मदत कक्षाचे उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष रमेश परदेशी,आशिष मेढे शालिग्राम गायकवाड,विजय महाजन व इतर मान्यवर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button