Arondol

लसीकरणाने केली कोरोनावर मात…!

लसीकरणाने केली कोरोनावर मात…!
विक्की खोकरे एरंडोल
एरंडोल : जनमाणसांत लसीकरणा बाबत अनेक गैरसमज आहेत . पण हे गैरसमज दुर व्हावेत अशी एक पोस्ट वाचनात आली .एरंडोल येथील आरोग्य दुत श्री विकी खोकरे यांनी मला ती पोस्ट फॉरवर्ड केली .एरंडोल पोलीस स्टेशनचे कार्यक्षम पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर जाधव , उपनिरिक्षक तुषार देवरे , पोलीस नाईक अकील मुजावर आणि संदिप सातपुते हे कोरोना रणभूमीवर सतत कार्यरत होते . त्यामुळे त्यांनी योग्य अंतराने दोनदा लसीकरण करून घेतले . दरम्यान या चौघांच्या सौभाग्यवती यांना कोरोना लागण झाली सहाजिकच ती आपल्या मुळे झाली असावी म्हणून या सर्वांनी कोरोना टेस्ट पुन्हा करून घेतल्या आणि विज्ञानाने आपली सिद्धता सिध्द केली . ही सगळी मंडळी निगेटीव्ह आली .लसीकरणाचा हा झालेला सुयोग्य आणि अपेक्षीत परिणाम आहे . कोराना प्रतिबंधाची ही साक्ष आहे .
तसं पाहिलं तर पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना युध्द भुमीवर अग्रस्थानी लढावे लागते . ही सर्व कर्तव्य बजावतांना पोलीस कर्मी जीवाची आणि कुदुंबाची सुध्दा पर्वा करीत नाही . त्यामुळे सर्वसामान्य माणूस सुरक्षित आहे . कुंपण काटेरी असलं तरी ते पीकाच्या संरक्षणासाठी आवश्यक आहेच . त्यांच्या या चोख कार्यप्रणालीमुळे एरंडोल शहरात लसीकरणाने उचांक गाठला . अर्थात जाधव साहेबांना पोलीस अधिक्षक डाॅ .प्रविण मुंढे यांचे मार्गदर्शन लाभले हे नमुद करावे लागेल .
या साठी आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचे अभिनंदन . ???
आणि या समर्पित कार्याला शुभेच्छा . ???????
अँड .विलास मोरे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button