Faijpur

फैजपूर येथील मौलाना अबुल कलाम आझाद शॉपिंग कॉम्प्लेक्स आठवडे बाजारातील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काँक्रीटीकरणाच्या ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी

फैजपूर येथील मौलाना अबुल कलाम आझाद शॉपिंग कॉम्प्लेक्स आठवडे बाजारातील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काँक्रीटीकरणाच्या ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : येथील गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या मौलाना अबुल कलाम आझाद शॉपिंग कॉम्प्लेक्स आवारातील आठवडेबाजारातील काँक्रिटीकरणाच्या ठिकाणी निकृष्ट काम झाल्यामुळे सर्वत्र ठिकाणी पाणी साचू लागले असून ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे झालेल्या या काँक्रीटीकरणाचे अगोदरचपासूनच तीनतेरा वाजायला सुरुवात झाली असल्याचे चित्र गेल्या आठवड्याभरापासून सुरू झाले असल्याचे चित्र दिसत आहे गेल्या महिना दीड महिन्याच्या कालावधीपासून या काँक्रिट करण्याचे काम रावेरच्या एका ठेकेदाराला मिळाले आहे एक कोटींच्या या कामात आणखी काही कामे शिल्लक असून प्रथमच काँक्रीटीकरण निकृष्ट दर्जाचे झाले असून उरलेले कामे कसे नगरपरिषदचे मुख्य अधिकारी किशोर चव्हाण हे ठेकेदारापासून कसे करुण घेणार अशी चर्चा असून जेव्हापासून काँक्रीटीकरणाला सुरुवात झाली तेव्हापासूनचया ठेकेदाराने नगरपरिषदेचे इंजिनीयर हे हजर असताना एकही ऐकली नाही मग हे काम उत्कृष्ट आहे काय असा प्रश्न सुध्दा सुज्ञ नागरिकांमध्ये उपस्थित झालेला आहे जेव्हापासून काँक्रिटीकरणाला सुरूवात झाली तेव्हापासून या ठेकेदाराने आपला मनमानी कारभार न थांबवता काँक्रिटीकरणाला लागणार्या सर्व वास्तू यामध्ये निकृष्ट दर्जाच्या सर्रासपणे वापरलेल्या आहे नगर पालिकेच्या इस्टीमेटप्रमाणे रेती सिमेंट आसारी सर्व हलक्या दर्जाच्या या कामामध्ये वापरण्यात आलेले आहे नगर परिषदेचे इंजिनीयर सुरुवातीपासून हजर असताना त्यांची या ठेकेदाराने का ऐकली नाही असा सवाल सुध्दा उपस्थित होत आहे या काँक्रीटीकरणामध्ये पाणी जाण्याचा कोणताही मार्गया ठेकेदाराने काढलेला नसल्यामुळे आज दिनांक २२ रोजी पावसाच्या सरी आल्यामुळे सर्वत्र काँक्रीटीकरणावर पाणी साचलेले असून पुढील येणार्या पावसात काँक्रीटीकरणाचे काय हाल होतील व पुढील जर आठवडे बाजार सुरू झालातर बाजार करणार्यांना पाण्यात चालून बाजार करावं लागेल काय असा प्रश्न उपस्थित झालेला असून शासनाचे एक कोटी रुपयांचे काय होणार का पहिल्याच पाण्यात जाणार कायअसा प्रश्न आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button