Arondol

एरंडोलला विठ्ठल मंदिरात पुजाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या

एरंडोलला विठ्ठल मंदिरात पुजाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या

एरंडोल : येथील देशपांडे गल्लीतील विठ्ठल मंदीराच्या
पुजायाची पत्नी ज्योती दत्तात्रय भागवत यांनी
विठ्ठल मंदीरात छतास दोर अडकवून गळफास घेऊन
आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना शुक्रवारी घडली. एरंडोल पोलिस स्टेशन सूत्रांकडून मिळालेली माहीती अशी की. एरंडोल येथील देशपांडे गल्लीतील
विकुलवाडी मंदीराचे पूजारी दत्तात्रयकेशव भागवत व त्यांच्या पत्नी ज्योती भागवत हे दाम्पत्य मंदीरास लागून
असलेल्या खोल्यांमध्ये वास्तव्यास आहेत. ११ जून रोजी दत्तात्रय भागवत हे सकाळी १० वाजेपासून कासोदा येथे
खाजगी कामानिनित्त गेले होते. दुपारी १.४५ वाजता ते परत आले असता मंदीर बंद आढळून आले. म्हणून त्यांनी ज्योती यांना फोन केला असता
मोबाईल उचलण्यात आला नाही. मंदीराच्या आजुबाजूला त्यांनी शोध घेत विचारपूस करण्यात केली.
तरीसूध्दा त्या दिसून आल्या नाहीत, भागवत यांच्या सोबत असलेला योगेश देशपांडे हा मंदीरावर चढून मंदिरात खाली उतरला तेव्हा ज्योती या मंदीरास
असलेल्या छताच्या कडीला सूताच्या दोरीने गळफास लावून वर लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्या. योगेश देशपांडे यांनी मंदीराचा दरवाजा उघडून जोरात किंकाळी मारली. तेव्हा दत्तात्रय भागवत व परीसरातील
लोकांनी ज्योती भागवत यांचा मृतदेह खाली उतरवला व खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात नेला. रुग्णालयात डॉक्टरांनी ज्योती यांनामृत घोषित केले. याबाबत पुढील
तपास श्रीराम पाटील, पंकज पाटील,संदीप सातपुते व अकील मुजावर हे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button