Kolhapur

कोरोना काळात घेतलेल्या ऑनलाईन परीक्षा शुल्क विद्यार्थांना परत करावा…!

कोरोना काळात घेतलेल्या ऑनलाईन परीक्षा शुल्क विद्यार्थांना परत करावा…!

सुभाष भोसले
कोरोनाच्या महामारीच्या काळात सर्वच परीक्षा ह्या प्रत्यक्ष लेखी स्वरूपात न घेता त्या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या गेल्या पण त्याची परीक्षा फी मात्र संपूर्ण पणे विद्यार्थ्यांकडून वसूल करणेत आली आणि ही प्रत्यक्षरित्या विद्यार्थांसोबतच पालकांची ही आर्थिक पिळवणूक आहे याचा नाहक त्रास हा सर्वच क्षेत्रातील विद्यार्थांना सोसावा लागला यासाठी विद्यार्थांच्याकडून वसूल करणेत आलेली परीक्षा फी त्यांना परत करावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कोल्हापुरच्या मार्फत करणेत आली.
विद्यार्थी हा ग्राहकच मानला जातो, शिक्षणासाठी तो ठरलेला शुल्क भरून सेवा घेत असतो, पण ह्या कोरोनाच्या महामारीसह अनेक जिल्ह्यात पर्जन्यवृष्टी मुळे अनेकांची कंबरडे मोडले त्यात ह्या दरवर्षी प्रमाणे प्रत्यक्षरित्या घेण्यात येणाऱ्या परीक्षा आपत्कालीन परिस्थिती मुळे ऑनलाईन पध्दतीने घेणेत आल्या पण त्याची फी मात्र प्रत्यक्ष परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या पद्धतीनेच विध्यार्थी वर्गाकडून वसूल करणेत आली, त्यामुळे ग्राहक म्हणून विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सोसावा लागला त्यांना न्याय मिळावा यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोल्हापूरच्या वतीने विद्यार्थांनकडून घेणेत आलेली परीक्षा फी ही परत करावी व फी ची रक्कम ही अंशतः परत न करता पूर्णतः ती परत करावी यासाठी शिवाजी विद्यापीठचे कुलगुरू डॉ डी. टी. शिर्के तसेच एस.एस.सी बोर्डचे विभागीय अध्यक्ष सत्यवान सोनवणे व विभागीय सचिव डी. बी.कुलाळ यांना निवेदन देण्यात आले, यावेळी कोल्हापूर ग्राहक पंचायत चे अध्यक्ष बी.जे पाटील (तात्या), पूणे विभागीय सदस्य सुशांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पाटील, जिल्हा संघटक सुरेश माने, जिल्हा सचिव दादासो शेलार, इचलकरंजी शहर अध्यक्ष सुरेंद्र दास, कोषाध्यक्ष संजय शिरदवाडे,सल्लागार सुकुमार नरेंदेकर, प्रसिद्धी विभाग प्रमुख सारंग दास आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button