Delhi

?️ आताची मोठी बातमी..शाळा,कॉलेज पुन्हा बंद होणार..? केंद्र सरकारने केला मोठा खुलासा

?️ आताची मोठी बातमी..शाळा,कॉलेज पुन्हा बंद होणार..? केंद्र सरकारने केला मोठा खुलासा

नवी दिल्ली – कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम आता शिथिल झाले आहेत. कोरोनाच्या काळात अनेक प्रकारचे खोटे मेसेजेस, अफवा पसरवण्यात आल्या. अजुनही अशा प्रकारचे मेसेज सेंड केले जात आहे. आताही अशाच एक मेसेज व्हायरल होत आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने तत्काळ शाळा आणि कॉलेज बंद करण्यात याव्यात असा दावा व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे. तसंच त्यासोबत काही न्यूज चॅनेल्सचे स्क्रीनशॉटही जोडण्यात आले आहेत. यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला आहे.
केंद्र सरकारने यावर उत्तर दिलं असून अशा प्रकारचे कोणतेही आदेश गृह मंत्रालयाने दिलेले नाहीत असं सांगितलं आहे.
पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने म्हटलं आहे की, सोशल मीडियावरून करण्यात आलेला दावा खोटा आहे. व्हायरल करण्यात आलेले फोटो खोटे आहेत.

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये ही जवळपास सात महिने बंद होते. राज्य सरकारने परिस्थितीनुसार शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. यातही कोरोनाचे प्रोटोकॉल पाळूनच शाळा उघडाव्यात असेही सरकारने सांगितले आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं, सॅनिटायझरचा वापर करणं या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात. तसंच विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासचा पर्यायसुद्धा उपलब्ध असेल. पालकांनी परवानगी दिली तरच विद्यार्थ्याला शाळेत जाता येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button