Pandharpur

ए डब्ल्यू एस यंग बिल्डर्स चॅलेंज 2021 मध्ये फॅबटेक पब्लिक स्कूलची निवड

ए डब्ल्यू एस यंग बिल्डर्स चॅलेंज 2021 मध्ये फॅबटेक पब्लिक स्कूलची निवड

प्रतिनिधी
रफिक आतार

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची ए डब्ल्यू एस यंग बिल्डर्स चॅलेंज 2021 टॉप शंभर शाळांमधून निवड झाली.विद्यार्थ्यांना त्याची सर्जनशीलता दाखवण्याची संधी देण्यासाठी तरुणांच्या मनातील वैज्ञानिक स्वभाव संगणकीय आणि डिझाईनिंग विचार, कोडींग कौशल्यांना प्राधान्य देण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि क्लाऊड कम्प्युटिंग यासारख्या विघटनकारी तंत्रज्ञानाची माहिती यावर प्रभाव या उद्देशाने ही स्पर्धा सीबीएसई ऍमेझॉन वेब सर्विस अटल इनोवेशन मिशन निती आयोग शिक्षा मन्त्रालय इनोव्हेशन सेल भारत सरकारने आयोजित केली होती. शाळेमधील इयत्ता सहावीतील कुमार अजय शरद पवार याला सर्टिफिकेट्स आणि रोख रक्कम बक्षीस मिळाले संपूर्ण भारतातील मान्यताप्राप्त सीबीएससी शाळा मधील इयत्ता सहावी ते बारावीतील विद्यार्थी सहभागी होते. ही स्पर्धा एक खुले आव्हान होते. शिक्षण, आरोग्य, सेवा, कृषी, वाहतूक या थीमसह 2021 चे कृत्रिम बुद्धिमत्ता देशाचे भविष्य कसे बदलू शकते याविषयावर कुमार अजय शरद पवार हा विद्यार्थी टॉप 100 शाळांमधून निवडला गेला.संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रूपनर यांनी अजयचे सत्कार करून कौतुक केले. तसेच संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रूपनर, श्री दिनेश रूपनर यांनीही अभिनंदन केले. तसेच कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे व प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांनीही अजयचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button